आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टेशनवर खाद्यपदार्थ विक्री बंद; अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नगरच्या रेल्वेस्टेशनवर २८ ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबरपर्यंत फिरत्या गाड्यांवरील खाद्यपदार्थाच्या विक्रीला अचानक बंदी घातल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. विशेष म्हणजे, हा प्रकार रेल्वेच्या पोलिस अधिकाऱ्यांने ही बंदी घातल्याने झाल्याची माहिती समजली.

 

नगरच्या स्टेशनवरून दररोज ४६ रेल्वे धावतात. त्यातून हजारो प्रवासी नगरहून जात-येत असतात. नगरचे स्टेशन स्वच्छतेच्या बाबतीत देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. स्टेशनवर खाद्यपदार्थ विक्री करणारे दोन कँटीन एक फूड प्लाझा आहे. त्यापैकी दोन्ही कँटीनला प्रत्येकी चार हातगाड्यांवर काद्यपदार्थ विक्री करण्याची परवानगी आहे. संपूर्ण प्लॅटफॉर्मची लांबी साडेसातशे मीटर आहे. प्रत्येक गाडीचे फक्त वातानुकुलित तीन ते चार डबे या कँटीनच्या समोर येतात. बाकीचे डबे लांब राहतात. त्यामुळे इतर डब्यांपर्यंत हातगाड्यांवरच खाद्यपदार्थ पोहोचवणे शक्य आहे. १३ दिवस हातगाड्या बंद असल्याने बाकीच्या डब्यांपर्यंत खाद्यपदार्थ पाणी पोहोचले नाही. दोन क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर तर स्थिती अतिशय भयानक होती. कारण तेथे एकही खाद्य पदार्थाचा स्टॉल किंवा कँटीन नाही.


या प्रॅटफॉर्मवर पिण्याच्या पाण्यासाठी पुरेसे नळही नाहीत. त्यामुळे प्रवाशांचे आतोनात हाल झाले. रेल्वे पोलिसांतील निरीक्षक अधिकाऱ्याने अचानक २७ ऑक्टोबर पासून फिरत्या गाड्यांवर खाद्यविक्री बंद केली. त्याला कोणतेही कारणही दिले नाही. विशेष म्हणजे, संबंधित दोन्ही कँटीनला रेल्वेनेच १९९६ पासून पत्राद्वारे प्रत्येकी चार हातगाड्यांवर खाद्य पदार्थांच्या विक्रीची परवानगी दिली आहे. तरीही असा तोंडी तुघलकी आदेश देऊन रेल्वेच्या अधिकाऱ्याने प्रवाशांचे हाल केले. या संदर्भात रेल्वेच्या विभागीय सल्लागार समितीचे सदस्य हरजितसिंग वधवा यांनी या बाबत ट्विटरवर आवाज उठवला. त्याची रेल्वे प्रशासनाने दखल घेऊन या प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले. शेवटी नऊ नोव्हेंबरपासून स्टेशनवर हातगाड्यांवरील खाद्यपदार्थांची विक्री पुन्हा सुरू झाली आहे. परंतु संबंधित अधिकाऱ्याच्या चौकशीची मागणी वधवा यांनी ट्विटरद्वारे केली आहे. रेल्वे पोलिस दलाने मात्र याबाबत काय कारवाई केली, याची माहिती मिळू शकली नाही. प्रवाशांचे हाल होतील, असा परवानाधारक कँटीनबाबत तोंडी आदेश देण्याचा संबंधित अधिकाऱ्याला अधिकार नाही, अशी माहिती समजली.

 

अनधिकृत विक्रेते मात्र मोकाट
एकीकडेअधिकृत विक्रेत्यांना त्रास देताना रेल्वेत अनधिकृतपणे निकृष्ट, तसेच अप्रमाणित खाद्यपदार्थांची विनातिकिट खाद्यपदार्थांची विक्री करणारे मात्र मोकाट आहेत. प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या विक्रेत्यांवर कोणतीही कारवाई होत नाही. त्यांच्याकडून हप्ते घेऊन हा प्रकार सर्रास चालत असल्याचे उघडपणे बोलले जाते. साधे तिकिट काढून रिझर्वेशनच्या डब्यात बसलेल्या प्रवाशाला गुन्हेगारासारखी वागणूक देणारे गाडीतील तिकिट निरीक्षक खाद्य विक्रेत्यांवर मात्र काहीही कारवाई करत नाहीत, या मागचे गौडबंगाल काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ‘दिव्य मराठी’ने या प्रकाराविरोधात अनेकदा वृत्ते देऊन आवाज उठवला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...