आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकांच्या संपामुळे 5 हजार कोटींची उलाढाल ठप्प

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- बँक कर्मचारी व अधिकारी यांनी केलेल्या संपामुळे शुक्रवारी जिल्ह्यात एक दिवसात पाच हजार कोटींची उलाढाल ठप्प झाली. या संपात 29 बँकांमधील 750 कर्मचारी सहभागी झाले होते. युनायटेड फोरम ऑफ बँक्स युनियन्सतर्फे हा संप पुकारण्यात आला होता.
संपात युनियनचे समन्वयक कांतीलाल वर्मा, वर्षा अष्टेकर, सी. एम. देशपांडे, माणिक आडाणे, उमाकांत कुलकर्णी, नंदू जोशी, उल्हास देसाई आदी यावेळी उपस्थित होते. युको बँकेसमोर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. वर्मा म्हणाले, बड्या औद्योगिक घराण्यांना व उद्योगपतींना अभय देत आहे. युनायटेड फोरमतर्फे बँकांमध्ये ती नोकर भरती करावी, कंत्राटीकरण रद्द करावे, कर्ज बुडवणाऱ्यांवर कारवाई करावी, अशा मागण्या कर्मचा-यांच्या आहेत.