आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटनियम दुरुस्ती; सभा होणार वादळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - प्राथमिक शिक्षक बँकेने कायम ठेवी हजारांपर्यंत वाढवण्यासाठी पावले उचलण्याची भूमिका घेतल्याने शिक्षकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यासह इतर पोटनियम दुरुस्तीच्या कारणावरून सत्ताधारी विरोधक यांच्यात वाजणार आहे. त्याची रणनीती आखण्यासाठी रविवारी झालेल्या विरोधी मंडळांच्या बैठकीत सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात आले.
प्राथमिक शिक्षक बँकेची निवडणूक झाल्यानंतर गुरुमाउली मंडळाने सत्ता स्थापन केली. सत्ता स्थापनेनंतर २८ ऑगस्टला पहिलीच सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून सभा उधळण्याचा प्रयत्न होऊ नये, यासाठी सत्ताधाऱ्यांनी संवादाची दारे उघडी ठेवली आहेत, तसेच सभेपूर्वीच समन्वय बैठक घेऊन शंकांचे निरसन करण्याचे ठरवले. यावेळी पत्रकारांनाही आमंत्रित करण्याचे नियोजन आहे. सत्तेवर आल्यानंतर पारदर्शी कारभार करून सभासद हिताला प्राधान्य देण्याची भूमिका गुरुमाउली मंडळाने मांडली होती, परंतु विरोधी असलेल्या गुरुकुल मंडळ, ऐक्य मंडळ, पुरोगामी तसेच इतर काही शिक्षक नेत्यांनी सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर ताशेरे ओढायला सुरुवात केली आहे. सत्ताधाऱ्यांचा कारभार सभासद हिताचा नसल्याचा सूर आळवला जात आहे. यासंदर्भात गुरुकुल, ऐक्य, पुरोगामीसह सदिच्छामधील काही नेत्यांच्या पाठिंब्यावर शिक्षक बँक कारभारविरोधी समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची सभा रविवारी माध्यमिक भवनात झाली. या वेळी शिक्षक नेते संजय कळमकर, संजय धामणे, राजेंद्र निमसे, लक्ष्मण चेमटे, किशोर हारदे, सुदर्शन शिंदे, किरण दहातोंडे, संतोष ढोरस्कर, संजय काळे, स्वप्निल बोरुडे, विजय महामुनी आदी उपस्थित होते.
सत्ताधाऱ्यांनी कायम ठेव हजार २०० वरून हजार करण्याचा प्रस्ताव मांडला असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. तसेच या ठेवी दरवर्षी शंभर रुपयांनी वाढवण्याचेही विचाराधिन आहे. बँकेकडून अवाजवी कपात करण्याचा प्रयत्न केला, तर कठोर पावले उचलली जातील, अशी भूमिकाही सभासदांनी घेतली आहे. सत्ताधाऱ्यांकडून चुकीच्या पोटनियमांच्या दुरुस्तीचा घाट घातला जात आहे, असा आरोपही केला जात आहे. तथापि, निर्णय वार्षिक सभा घेणार आहे. सभेत मंजुरी मिळाली तरच कपात होणार आहे.

मृत निधी सात लाख कर्जमर्यादा असतान १५० रुपये कपात केला जात होता. कर्जमर्यादा ११ लाख असल्याने त्यात वाढ करण्याचे नियोजन सत्ताधारी मंडळींचे आहे. मृत निधीलाच नव्याने सभासद निवारण निधी असे नाव देण्यात आले आहे. जे सभासद दुर्धर आजाराने ग्रासलेले असतील, किंवा बडतर्फ असतील या शिक्षकांच्या कर्जाचा हप्ता जामीनदारांच्या पगारातून कपात होऊ नये, यासाठी मृत निधी २०० रुपये करण्याचे नियोजन असल्याचे सत्ताधाऱ्यांचे म्हणणे आहे. एकूणच विरोधी मंडळांनी आगामी सभेत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरून जाब विचारण्याची रणनिती आखली आहे. सत्ताधारीही त्यासाठी तयार असल्याने सभा वादळी होण्याची शक्यता आहे.

सभासद ठरवतील तो निर्णय मान्य...
^आम्ही पोटनियम दुरुस्तीचा प्रस्ताव ठेवला आहे. त्याला मंजुरी द्यायची किंवा नाही हे सभासद सभेत ठरवतील. विरोधकांनीही चर्चेला बसावे. कायम ठेवी बँकेचे भांडवल वाढवण्यासाठी सभासदांनी मंजुरी दिली तरच मान्य करू.'' रावसाहेबरोहोकले, अध्यक्ष, प्राथमिक शिक्षक बँक, नगर.

उपनिबंधकांकडे तक्रार करणार
सत्ताधाऱ्यांनी पोटनियम दुरुस्तीसाठीचा प्रस्ताव ठेवल्यानंतर संतप्त झालेल्या विरोधी मंडळातील शिक्षकांनी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार करण्याची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे सर्वच विरोधी मंडळी एकत्र आल्याने हा वाद चांगलाच चिघळणार आहे.

सदिच्छा मंडळही विरोध करणार
^आम्ही समन्वय समितीच्या सभेला जाऊ शकलो नाही. पण पोटनियम दुरुस्तीला आमचा विरोध आहे. सभेत जिल्ह्यातील सर्व सभासदांच्या वतीने सभासद हितासाठी हा विरोध असेल. समन्वय समितीच्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे. बँकेत सध्या चुकीचा कारभार सुरू आहे.'' राजेंद्रशिंदे, शिक्षक नेते, सदिच्छा.
बातम्या आणखी आहेत...