आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बौद्धविहारमुळे भिंगारच्या वैभवात भर, कळमकर यांचे प्रतिपादन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- भिंगारकरांची अनेक दिवसांची मागणी आता पूर्ण झाली आहे. पंचशीलनगर येथे बुद्धविहाराचे काम सुरू झाले आहे. अजिंक्य भिंगारदिवे भिंगारवासीयांनी पाठपुरावा केल्यामुळे आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला. या बौद्धविहारमुळे भिंगारच्या वैभवात भर पडेल, असा विश्वास दादा कळमकर यांनी व्यक्त केला. 

या बुद्धविहाराचे भूमिपूजन आमदार जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भदंत डॉ. आनंद, धम्मातिस्स थेरो, शाक्यपुत्र अमृतानंद बोधी, अशोक गायकवाड, नगरसेवक नज्जू पहिलवान, मुसा सय्यद, विजय गव्हाळे, सुरेश मेहतानी, निखिल वारे, सुरेश बनसोडे, परिमल निकम, अजिंक्य भिंगारदिवे, एकनाथ भिंगारदिवे, किशोर भिंगारदिवे, सुहास सोनवणे, गौतम आंग्रे, सुहास धीवर, संध्या मेढे, साधना बोरुडे, अनिल ओहोळ, विजय बोंदर्डे, संजय बडेकर, सिद्धार्थ आढाव, धनंजय पाखरे, ऋषी रणसिंग, सुजन भिंगारदिवे, विकास आठवले आदी उपस्थित होते. 

कळमकर म्हणाले, २५ वर्षांपूर्वी आमदार असताना मी बौद्धविहारासाठी जागा उपलब्ध करून दिली. आता जगताप यांच्या निधीतून बुद्धविहाराचे काम सुरू होत आहे. भिंगारच्या वैभवात या वास्तुमुळे भर पडेल. बनसोडे म्हणाले, सुमारे १० लाख रुपये खर्चून ही आकर्षक वास्तू उभारण्यात येणार आहे.