आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीसी गर्ल्स होस्टेलच्या मोकळ्या जागेत पिकवला जातो भाजीपाला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
होस्टेलच्या मोकळ्या जागेत पिकलेली भाजील्याची शेती. - Divya Marathi
होस्टेलच्या मोकळ्या जागेत पिकलेली भाजील्याची शेती.
सोलापूर - बीसीगर्ल्स होस्टेलमध्ये मोकळ्या जागेचा वापर भाजीपाला पिकवण्यासाठी करण्यात येत आहे. येथे फुललेल्या परसबागेतून विविध प्रकारच्या पालेभाज्या उपलब्ध होत असल्याने होस्टेलचा खर्च बऱ्यापैकी कमी झाला आहे. वर्षाकाठी सुमारे ३० हजार रुपयांची बचत होत आहेत.
या वसतिगृहामध्ये ते १८ वर्षांपर्यंतच्या १३० मुली राहतात. या मुलींच्या आहारामध्ये स्वच्छ ताज्या पालेभाज्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी परसबाग निर्माण केली आहे. ही परस बाग दहा वर्षांपासून सुरू आहे. परिसरातच भाज्या उपलब्ध होत असल्याने वसतिगृहातील मुलींच्या आहारात विविध प्रकारच्या भाज्या असतात.

मुलींचे आरोग्य चांगले राहण्यास शरीरात पोषक तत्त्वे मिळण्यास मदत होते. महिन्याकाठी वसतिगृहांसाठी साधारणपणे हजारहून अधिक रुपयांची भाजी लागते. परंतु मोकळ्या जागेमध्ये परसबाग तयार केल्याने संस्थेचे पैसे बचत होण्यास मदत होते.

पालेभाज्या आणि फळझाडेसुद्धा
वांगी, पालक, मेथी, कोथिंबीर, चुका, राजगिरा, आळू, शेवगा, कोबी फ्लाॅवर आदी पिके घेतली जातात. याशिवाय परिसरात नारळ, पपई, पेरू, चिंच जांभूळ या प्रकारची झाडे आहेत. नारळापासून खोबरे चटणी बनवण्यात येते. वसतिगृहातील मुलींना बागेतील कामाची माहिती व्हावी यासाठी काम करण्याची संधी मिळते.

-वसतिगृहामध्ये परसबागहा उपक्रम दहा वर्षांपासून घेतला जात आहे. त्यामुळे वर्षाकाठी सरासरी ३० हजार रुपये वाचण्यास मदत होते. पालेभाज्या चांगल्या उपलब्ध होत असल्याने मुलींचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. हा उपक्रम संस्थेतील सर्वांच्या सहकार्यामुळे होत आहे.''
अंजलीनानल, अध्यक्ष, होस्टेल
बातम्या आणखी आहेत...