आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्यावधीसाठी तयार राहा; दिलीप वळसे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन, कर्जमाफीवर प्रश्नचिन्ह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत बोलताना पक्षाचे प्रभारी दिलीप वळसे. - Divya Marathi
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत बोलताना पक्षाचे प्रभारी दिलीप वळसे.
नगर : सध्या कलगीतुरा सुरू असून शिवसेने भुकंप घडवून आणण्याची भाषा केली, असताना पुन्हा सत्ताधारी मध्यावधी घेण्याची तयारी दर्शवली जाते. त्यामुळे पुढील काळात मध्यावधी निवडणुका झाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तयार राहावे, असे आवाहन पक्षाचे प्रभारी दिलीप वळसे यांनी केले. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण नसलेले सरकार सत्तेत बसले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. 
 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना वळसे म्हणाले, राजकीय पक्षाला नवडणुकीला तयार राहावे लागते. पण मध्यावधीबाबत शिवसेनेच्या मनावर असून त्यांना आता डोहाळे का ? लागले हेच कळत नाही. शिवसेना म्हटली भुकंप घडवू आणि ते म्हणतात मध्यावधी होईल असे सांगतात, असे सांगितले. तत्पूर्वी बैठकीतही वळसे यांनी हाच धागा धरून मध्यावधी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तयार राहावे असे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आढावा घेऊन कर्जमाफीसंदर्भात चर्चा करण्यासाठी पक्षाची शुक्रवारी राष्ट्रवादी भवनात बैठक झाली. यावेळी माजी मंत्री मधुकर पिचड, आमदार वैभव पिचड, संग्राम जगताप, राहूल जगताप, पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजश्री घुले, पक्षाचे ज्येष्ठ नेते दादा कळमकर, पांडुरंग अभंग, अविनाश अदिक, सभापती कैलास वाकचौरे, राजेंद्र फाळके, उमेश परहर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे, सोमनाथ धूत, अॅड. शारदा लगड आदी उपस्थित होते.
 
वळसे म्हणाले, लवकरच जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुका होणार आहेत. आपल्या पक्षाचे सदस्य नियोजन समितीत पाठवले, तर आमदारांपेक्षाही सदस्यांना अधिक महत्त्व आहे. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती सरकारच्या निदर्शनास आणून कर्जमाफीची भूमिका मांडली. कर्जमाफीचा प्रश्न सुटत नाही. पक्षाने संघर्ष यात्रा काढली, पण माध्यमांनीही या यात्रेला प्रतिसाद मिळाला नसल्याचे चित्र रंगवले. सरकार मेट्रो, बुलेट ट्रेन सुरू करण्यासाठी तरतूद करून शेतकरी विरोधी धोरण राबवत आहे.
 
शेतकरी संपाला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची फूस असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते, पण यांनी पहाटे वाटाघाटी करून संप मिटल्याचे जाहीर केले. पण चार मंत्र्यांनी कर्जमाफी केली तर कर्जमाफी होत नाही, यासाठी कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा लागतो. तुम्ही ज्या अधिकाराने जिल्हा बँकेला पैसे द्यायला सांगता त्या बँका अडचणीत आहेत.
 
शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण नसलेले सरकार सत्तेत आहे. सध्या सत्ताधाऱ्यांमध्ये कलगीतुराच चालु आहे. पण मध्यावधी निवडणुका झाल्यास राष्ट्रवादी पक्षही तयार असावा त्यानुसार नियोजन करावे, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले. 

कर्मचाऱ्यांना जगण्यापुरते आहे 
शेतकऱ्यांप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या मागणीसंदर्भात भूमिका घेणार का ? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला, त्यावर वळसे म्हणाले त्यांना जगण्यापुरते आहे. पण त्यांची सध्याची मागणी गैर नाही, असे सांगून त्यांनी कर्मचारी मागणीला पाठिंबा दर्शवला. 
 
वळसेंकडून विखेची पाठराखण 
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी आधीच्या सरकारने शेतकऱ्यांना गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे प्रायश्चित्त घ्यावे असे वक्तव्य दोन दिवसांपूर्वी केले. त्यावर दिलीप वळसे यांनी विखेंची पाठराखण करीत ते असे म्हणणार नाहीत. तुम्ही चुकीचा अर्थ घेतला असे स्पष्ट केले. 
 
मध्यावधीची तयारी सुरू 
मध्यावधी निवडणुका झाल्या तर तयारी असायला हवी, यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जिल्हा निहाय दौरे सुरू आहेत. तालुकानिहाय चर्चा होईल, असे माजी मंत्री मधुकर पिचड यांनी सांगितले. 
 
क्लृप्त्या काढून शेतकरी वगळणार 
आता सरकार संपूर्ण कर्जमाफी करणार की अल्पभुधारकांची चौकशी करणार. अशा क्लृप्त्या काढून शेतकऱ्यांना लाभातून वगळून फसवण्याचे काम सरकार करत आहे. संपूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचेही वळसे यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...