आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूच्या व्यवसायातून संगमनेरमध्ये हाणामारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर - देशीदारुच्या व्यवसायातून दाेन गटांत जोरदार मारामारी आणि दगडफेक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष शौकत जहागीरदार यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, तर अन्य एकाला उपचारानंतर घरी सोडण्यात आले. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या असून दहापैकी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. सर्वांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस काेठडी दिली.

शनिवारी रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. रविवारीही शहरात तणावपूर्ण शांतता होती. अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी दुपारी पत्रकार परिषदेत या घटनेची माहिती दिली. उपअधीक्षक अजय देवरे, निरीक्षक गोविंद आेमासे यावेळी उपस्थित होते.
मेनरोड येथे पेटकर यांच्या मालकीचे देशी दारूचे सरकारमान्य दुकान आहे. विनोद मनोहर सूर्यवंशी रात्री तेथे आला. त्याचे शौकतअली जहागिरदारचे दारू देण्यावरून वाद झाले. जहागिरदार दारू विक्रेता संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यातील वादाचे पर्यावसन मारामारीत झाल्याने शहरात तणाव निर्माण झाला. प्राणघातक हल्ला करून आपल्याला जखमी केल्याची तक्रार जहागीरदार यांनी पोलिस दिली असून सहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
शौकत जहागिरदार यांच्या तक्रारीवरून योगेश मनोहर सूर्यवंशी, सागर मनोहर सूर्यवंशी, वासुदेव लक्ष्मण सोमासे, उमेश मनोहर सूर्यवंशी, विनोद मनोहर सूर्यवंशी सूरज किरण बागे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली. विनोद सूर्यवंशी याच्या तक्रारीवरून शौकतअली जहागीरदार, जैश शौकतअली जहागिरदार, आवेज जहागिरदार, मोईज मुश्ताक सय्यद यांच्यासह चार-पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून जैश आणि मोईज सय्यद यांना अटक झाली आहे. या घटनेनंतर शहरात अनुचित प्रकार घडू नये म्हणून बंदाेबस्त वाढवला अाहे.

वृत्त खरे ठरले
दोनचिदवसांपूर्वी शुक्रवारी 'दिव्य मराठी’ने शहरात जुगारअड्डे सुरू झाल्याचे स्पष्ट करून अवैध धंद्यांमुळे शांततेला गालबोट लागण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानंतर दोन दिवसांत वाळूतस्करांकडून पोलिसांवर हल्ल्याची अवैध दारू विक्रीतून मारामारीची घटना घडली.
बातम्या आणखी आहेत...