आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंपन्यांच्या मदतीने चौकांचे सुशोभीकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - भारतीय जनता पक्षाने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला उपमहापौरपद दिले. ही जबाबदारी पेलताना नगर शहराच्या विकासासाठी मी प्राधान्य देणार आहे. शहराच्या वैभवात भर पडावी, यासाठी एमआयडीसीमधील कंपन्यांच्या सहकार्याने विविध चौकांचे सुशोभीकरण करण्यात येईल. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल, अशी घोषणा नूतन उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी केली.
भाजप औद्योगिक आघाडीतर्फे एमआयडीसीतील विविध कंपन्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. उपमहापौर छिंदम भाजपचे गटनेते सुवेंद्र गांधी यांच्या हस्ते झाडे लावण्यात आली. यावेळी औद्योगिक आघाडीचे प्रमुख विश्वनाथ पोंदे, सहसचिव किशोर रेणावीकर, उपाध्यक्ष अमोल घोलप, मिलिंद गंधे, राजेश पलाई, अजित चाबुकस्वार, खजिनदार श्रीनिधी सोमाणी, हर्षवर्धन देशपांडे, आशिष कांबळे, भाजप शहर चिटणीस किशोर बोरा, प्रसन्न खासगीवाले, कन्हैया व्यास, प्रसाद बोरा विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी गांधी म्हणाले, भाजपची राज्यात केंद्रात सत्ता आल्यानंतर पंतप्रधान मुख्यमंत्र्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन विविध योजना सुरू केल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कोटी वृक्षांची लागवड करण्याच्या उपक्रमासही प्रचंड प्रतिसाद मिळाला. नगरमध्ये लाखोंच्या संख्येने एका दिवसात झाडे लावली गेली.

एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. त्यामुळे विविध कारखान्यांच्या आवारात भाजप औद्योगिक आघाडीने झाडे लावून एक प्रकारे पर्यावरणाचे संतुलन साधले आहे, असे गांधी म्हणाले. प्रास्ताविक औद्योगिक आघाडीचे प्रमुख विश्वनाथ पोंदे यांनी केले. आभार हर्षवर्धन देशपांडे यांनी मानले.

जिल्हारुग्णालय परिसरात वृक्षारोपण
जिल्हा रुग्णालयाच्या आवारात आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. पी. बी. बरुटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. एम. सोनवणे, रोटरी क्लबचे डॉ. प्रकाश कांकरिया, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, डॉ. एम. बी. बेळंबे, प्रशासकीय अधिकारी आर. एस. माने, एन. एल. डोंगळे, अधिसेविका रोहिणी नगरे, उपअधिसेविका ए. आर. गायकवाड उपस्थित होते. डॉ. बरुटे म्हणाले, जागतिक तापमानात होत असलेल्या वाढीला मानवाला सामोरे जावे लागत आहे. या सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी वृक्ष लागवड हा उत्तम पर्याय आहे. डॉ. सोनवणे म्हणाले, हा सर्वांच्या हिताचा संकल्प आहे. तो पूर्ण करण्यासाठी सर्वांनी झोकून दिले, तर वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट सहज साध्य होईल. यावेळी ५१ वृक्ष लावण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...