आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडच्या शिक्षकांसाठी नगर झेडपीत चाचपणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - बीडजिल्ह्यात जागा रिक्त नसताना आंतरजिल्हा बदलीने शिक्षक स्वीकारल्याने सुमारे साडेसातशे शिक्षक अतिरिक्त होऊन त्यांच्या नियुक्तीचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार बीड जिल्ह्याचा शिक्षण विभाग राज्यभर रिक्त जागांची चाचपणी करत आहे. नगर जिल्ह्यातून बीडला बदलून गेलेल्या २७ शिक्षकांची माहितीही संकलित करण्यात आली आहे.
मूळ जिल्ह्यातून नोकरीनिमित्त अथवा इतर कारणांनी इतर जिल्ह्यात सेवेत असलेल्या शिक्षकांना मूळ जिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीने येण्याची संधी असते. पण झपाट्याने घसरणारा पट त्या तुलनेत असलेली शिक्षकांची संख्या वाढत असल्याने शिक्षक अतिरिक्त ठरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हा परिषद शाळांची खासगी शाळांशी मोठ्या प्रमाणात स्पर्धा सुरू आहे. खासगी शाळांकडून केल्या जाणाऱ्या जाहिरातबाजीमुळे पालकांचा ओढा खासगी शाळांकडे वाढला आहे. गुणवत्तेच्या बाबतीतही या शाळा सरस असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पट घसरून शिक्षक अतिरिक्त होत आहेत.

बीड जिल्हा परिषदेने शिक्षकांच्या रिक्त जागा नसताना सुमारे ९२५ शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीतून स्वीकारले होते. पण जागा रिक्त नसल्याने सुमारे ७४५ शिक्षक जून २०१४ पासून अतिरिक्त ठरले आहेत. या शिक्षकांना वेतन मिळत नसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे या शिक्षकांच्या सेवा प्रत्यार्पित करण्याचा निर्णय सरकारने २४ एप्रिलला घेतला. त्याविरोधात शिक्षकांनी न्यायालयात दाद मागितली आहे. यासंदर्भात १३ जुलैला झालेल्या सुनावणीत अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचा प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्या जिल्हा परिषदेत किती जागा रिक्त आहेत, याची माहिती सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार बीडचे अधिकारी राज्यभरातून रिक्त जागांची माहिती संकलित करत आहेत.

नगर जिल्ह्यात आधीच २०७ शिक्षक इतर जिल्ह्यांतून बदलून येण्यास इच्छुक आहेत. तशी परवानगीही जिल्हा परिषदेने दिली आहे. पण शासनाकडून स्थगिती मिळाल्याने या शिक्षकांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यातच बीड जिल्हा परिषदेतील अतिरिक्त शिक्षक जिल्ह्यातील रिक्त जागांवर समायोजित होण्याच्या भीतीने अनेकांच्या पोटात गोळा येणार आहे.
बीडजिल्ह्यात जागा रिक्त नसताना आंतरजिल्हा बदलीने शिक्षक स्वीकारल्याने सुमारे साडेसातशे शिक्षक अतिरिक्त होऊन त्यांच्या नियुक्तीचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार बीड जिल्ह्याचा शिक्षण विभाग राज्यभर रिक्त जागांची चाचपणी करत आहे. नगर जिल्ह्यातून बीडला बदलून गेलेल्या २७ शिक्षकांची माहितीही संकलित करण्यात आली आहे.

मूळ जिल्ह्यातून नोकरीनिमित्त अथवा इतर कारणांनी इतर जिल्ह्यात सेवेत असलेल्या शिक्षकांना मूळ जिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीने येण्याची संधी असते. पण झपाट्याने घसरणारा पट त्या तुलनेत असलेली शिक्षकांची संख्या वाढत असल्याने शिक्षक अतिरिक्त ठरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हा परिषद शाळांची खासगी शाळांशी मोठ्या प्रमाणात स्पर्धा सुरू आहे. खासगी शाळांकडून केल्या जाणाऱ्या जाहिरातबाजीमुळे पालकांचा ओढा खासगी शाळांकडे वाढला आहे. गुणवत्तेच्या बाबतीतही या शाळा सरस असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पट घसरून शिक्षक अतिरिक्त होत आहेत.

बीड जिल्हा परिषदेने शिक्षकांच्या रिक्त जागा नसताना सुमारे ९२५ शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीतून स्वीकारले होते. पण जागा रिक्त नसल्याने सुमारे ७४५ शिक्षक जून २०१४ पासून अतिरिक्त ठरले आहेत. या शिक्षकांना वेतन मिळत नसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे या शिक्षकांच्या सेवा प्रत्यार्पित करण्याचा निर्णय सरकारने २४ एप्रिलला घेतला. त्याविरोधात शिक्षकांनी न्यायालयात दाद मागितली आहे. यासंदर्भात १३ जुलैला झालेल्या सुनावणीत अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचा प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्या जिल्हा परिषदेत किती जागा रिक्त आहेत, याची माहिती सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार बीडचे अधिकारी राज्यभरातून रिक्त जागांची माहिती संकलित करत आहेत.

नगर जिल्ह्यात आधीच २०७ शिक्षक इतर जिल्ह्यांतून बदलून येण्यास इच्छुक आहेत. तशी परवानगीही जिल्हा परिषदेने दिली आहे. पण शासनाकडून स्थगिती मिळाल्याने या शिक्षकांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यातच बीड जिल्हा परिषदेतील अतिरिक्त शिक्षक जिल्ह्यातील रिक्त जागांवर समायोजित होण्याच्या भीतीने अनेकांच्या पोटात गोळा येणार आहे.
जिल्ह्यात विविध प्रवर्गाच्या १३२ रिक्त जागा

नगरजिल्ह्यामध्ये विविध प्रवर्गाच्या सुमारे १३२ जागा रिक्त असल्याची माहिती बीडच्या उपशिक्षणाधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेने दिली आहे, जर यासह संभाव्य (पुढील कालावधीत रिक्त होणाऱ्या) जागांचा विचार करून या जागांवर बीडच्या अतिरिक्त शिक्षकांना नियुक्त्या मिळाल्यास नगरमध्ये नियोजित आंतरजिल्हा बदली अडचणीत येईल.

बीडची सद्यस्थिती
बीडजिल्ह्यात मागील वर्षी सुमारे ९४५ शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने स्वीकारले गेले. पण जिल्ह्यातील शाळांमध्ये जागा रिक्त नसल्याने त्यापैकी ७४५ शिक्षक अतिरिक्त ठरले. या शिक्षकांच्या वेतनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच संबंधित शिक्षक नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

आवश्यक माहिती दिली
नियमानुसारसंबंधित उपशिक्षणाधिकाऱ्यांना आजमितीला रिक्त असलेल्या १३२ जागांची माहिती कळवली आहे. रिक्त जागांचा अहवाल देत असताना आपल्या जिल्ह्यातून आंतरजिल्हा बदलीने बीडमध्ये गेलेल्या शिक्षकांचीही माहिती दिली आहे.'' अशोककडूस, जिल्हा शिक्षणाधिकारी.

त्यांचीही चौकशी
नगरमधूनबीडमध्ये आंतरजिल्हा बदलीने बदलून गेलेल्या २७ शिक्षकांना कार्यमुक्त केले होते का? त्यापैकी काही शिक्षक बोगस होते का ? याचीही चौकशी बीड येथून आलेल्या अधिकाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे नियमांच्या कचाट्यात सापडणाऱ्या शिक्षकांच्या अडचणी वाढणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...