आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चितळे रस्त्यावरील बिअर शॉपीवर हल्ला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - चितळे रस्त्यावरील एका बिअर शॉपीवर रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास दहा-पंधराजणांनी सशस्त्र हल्ला केला. यात सुमारे 40 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे बिअर शॉपीचे मालक कल्पेश परदेशी यांनी सांगितले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. परदेशी यांनी सांगितले की, माझे वडील अमरसिंह परदेशी सायंकाळी दुकानात असताना सहाच्या सुमारास दहा ते पंधराजणांच्या जमावाने दुकानावर सशस्त्र हल्ला केला. जमावातील तरुणांच्या हातात तलवारी, काठ्या व लोखंडी पाईप होते. जमावाने बिअर शॉपीची तोडफोड करून गल्ल्यातील सुमारे 20 ते 22 हजार रुपये लांबवले. या हल्ल्यात सुमारे 40 हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे परदेशी यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकारानंतर आमदार अनिल राठोड यांनी घटनास्थळास भेट दिली.