आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भगवानगडावरील वाद: पाेलिस, प्रशासकीय प्रयत्न व्यर्थ; तणावाचे सावट कायम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी - भगवानगडावरील दसरा मेळाव्यात राजकीय भाषण करण्यावरून ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व गडाचे महंत डाॅ. नामदेवशास्त्री सानप यांच्यात सुरू असलेल्या वाक््युद्धामुळे एक दिवसावर येऊन ठेपलेल्या या साेहळ्यावर तणावाचे गडद सावट निर्माण झाले अाहे. महंत डॉ. नामदेव शास्त्री यांची भूमिका जाणून घेऊन संभाव्य तणाव टाळण्यासाठी जिल्हाधिकारी अनिल कवडे, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी रविवारी सुमारे अर्धा तास भगवानगडावर महंतांशी बंद खोलीत चर्चा केली. या चर्चेचा तपशील समजू शकला नसला, तरी डॉ. शास्त्री व पंकजा मुंडे अापल्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती अाहे. त्यामुळे प्रशासनाच्या मध्यस्थानीनंतरही या वादावर रविवारी ताेडगा निघू शकला नाही. खबरदारीचा उपाय म्हणून पाेलिसांनी पाचशे जणांना प्रतिबंधात्मक नाेटिसा बजावल्या असून त्यापैकी काहींना ताब्यात घेतले जाण्याचीही शक्यता अाहे.
भगवानगडावर राजकीय भाषणबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर महंत नामदेवशास्त्री व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या समर्थकांत निर्माण झालेले वादळ सोशल मीडियात व्हायरल झालेल्या दाेघांच्याही क्लीपमुळे वैयक्तिक पातळीवर येऊन ठेपले आहे. भाषणासाठी आक्रमक झालेले मुंडे समर्थक व प्रतिकार करण्यास सज्ज असलेले भगवानगडाचे स्वयंसेवक यांच्यातील संभाव्य तणाव टाळण्यासाठी झाेप उडालेल्या प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुुरू आहेत.
भगवानगडाला रविवारीच पोलिस छावणीचे रूप आले. पाण्याचा फवारा मारणाऱ्या गाड्यांपासून सशस्त्रधारी शीघ्र कृती दल, राज्य राखीव दल व विशेष प्रशिक्षित पोलिसांच्या तुकड्या गडावर तैनात करण्यात आल्या आहेत. विशेष पथकाच्या जवानांनी महंतांच्या दालनाला वेढा दिला आहे. सुमारे एक हजार पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती मेळाव्यासाठी होणार आहे. पूर्वीच्याच जागेवर तीन हेलिकॉप्टर उतरू शकतील, अशी सुविधा करण्यात आली आहे. ड्रोन कॅमेऱ्याद्वारे सुरक्षा यंत्रणांकडून मेळाव्याचे चित्रीकरण केले जाईल. मंत्री पंकजा मुंडे दसरा मेळाव्याला गडावर येणार असल्याचा शासकीय दाैरा निश्चित झाला अाहे. त्यामुळे त्या गडावर असेपर्यंत भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन रांगेतूनच देण्यासाठी विशेष दर्शनबारीची साेय करण्यात येणार अाहे. तसेच ठिकठिकाणी अडथळे उभारून जागा गुंतवण्यात आल्याने मुंडे यांच्या संभाव्य सभेला मंदिर परिसरात जागा उपलब्ध होऊ शकणार नाही.
या दसरा मेळाव्याला सुमारे अाठ ते दहा लाख भाविक उपस्थित राहतील, असा अंदाज कृती समितीचा असल्याने प्रशासनाने त्या दृष्टीने तयारी केली आहे. जिल्हाधिकारी व पाेलिस अधीक्षकांनी आपल्या यंत्रणेसह रविवारी गडाची संपूर्ण पाहणी करून सुरक्षेच्या दृष्टीने आढावा घेतला. या वेळी प्रांताधिकारी प्रशांत खेडेकर, तहसीलदार जयसिंग भैसडे, उपअधीक्षक अभिजित पाटील, पोलिस निरीक्षक पवार यांच्यासह विशेष दलाचे, तसेच गुप्तचर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महंतांनी काही काळ दालनाबाहेर येऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना अडथळे उभारल्याबाबत माहिती दिली. याबाबत प्रसारमाध्यमाशी बोलण्यास मात्र महंत, जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी नकार दिला. त्यामुळे चर्चेचा अधिकृत तपशील समजू शकला नाही.

धरपकड शक्य
मेळावा घेण्यासाठी मुंडे समर्थकांनी माेठ्या प्रमाणावर तयारी केली अाहे. तर महंत समर्थक कार्यकर्तेही विराेधासाठी तेवढेच अाक्रमक झाले अाहेत. मंगळवारी दसरा मेळाव्यात हाेणारा हा संघर्ष टाळण्यासाठी पाेलिसांनी गड व परिसरातील सुमारे पाचशे कार्यकर्त्यांना मुंबई पोलिस अधिनियम १४९ प्रमाणे प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या आहेत. यामध्ये महंत व मुंडे या दाेघांच्याही समर्थकांचा समावेश अाहे. तसेच मेळाव्यापूर्वी साेमवारपासूनच काही विशिष्ट कार्यकर्त्यांना पोलिस ताब्यात घेण्याचीही व्यूहरचना अाखली जात असल्याचे सांगितले जाते.
महंतांचा ‘धनी’ उघड : केंद्रे
पंकजा मुंडेंचे भाषण तर हाेणारच. रासप, समता परिषद, रिपाइं, ‘स्वाभिमानी’चे हजाराेचे समर्थक गडावर येताहेत. काहीच अनुचित प्रकार करायचा नाही, अशी भगवानबाबांची शपथ कार्यकर्त्यांनी घेतली आहे, असे माजी आमदार व भाजपचे प्रदेश सरचिटणीस गोविंद केंद्रे यांनी सांगितले. पंकजा यांच्या वक्तव्याच्या क्लीपमधून विपर्यास करण्यात अाला अाहे. ही क्लिप प्रसिद्ध हाेताच धनंजय मुंडेंकडून पंकजांच्या राजीनाम्याची मागणी होते. यावरून महतांचा बोलविता धनी कोण आहे, हे आम्ही सांगण्याची गरज नाही, असे केंद्रे म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...