आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंकजा मुंडे यांच्या भाषणाला संरक्षक कठड्यांचा अडथळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - भगवानगडावर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना जमावाला संबोधित करता येऊ नये, तसेच एकाच ठिकाणी मोठ्या संख्येने लोकांना उभे राहता येऊ नये यासाठी गडाच्या आत ठिकठिकाणी संरक्षक कठडे उभारण्यात आले आहेत. त्यामुळे मुंडे यांना भाषण करायचे झाल्यास या संरक्षक कठड्यांच्या अडथळ्याची शर्यत पार करावी लागणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाषणाच्या मुद्द्यावरुन मुंडे महंत नामदेवशास्त्री यांच्यात चांगलीच जुंपली आहे. गडावर कुणीही राजकीय भाषण करू नये, असे शास्त्रींनी गेल्या वर्षीच स्पष्ट केले असले, तरी मागील पंधरा दिवसांत हा वाद जास्त चिघळला. त्यामुळे शास्त्री मंुडे समर्थकांत सध्या अस्वस्थतेचे वातावरण आहे. पंकजा दसऱ्यासाठी गडावर येणार हे आता निश्चित झाले असून त्यांना गडावर भाषण करता येऊ नये, याची काळजी ट्रस्टने घेतली आहे. त्यासाठी गडावरील कमानीच्या आतील भागात ठिकठिकाणी तीन-तीन फूट अंतरावर संरक्षक कठडे उभारण्यात आले आहेत. दसऱ्याच्या दिवशी महंतांच्या दालनात थेट कुणालाही जाता येऊ नये, यासाठी तीन टप्प्यांत पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर गडाच्या परिसरातील पाच गावे १२ वाड्या-वस्त्यांचा परिसर पोलिसांनी रविवारी पिंजून काढला असून, प्रशासनाचे प्रमुख गडावरील हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.
सीसीटीव्हीचा वॉच
दसऱ्याच्या दिवशी नगर, बीडसह राज्यभरातून भाविक गडावर येणार आहेत. भाविकांची वाढती गर्दी, तसेच शास्त्री-मुंडे समर्थकात सुरू असलेला वादाच्या पार्श्वभूमीवर गडाच्या परिसरात २५ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. गडाच्या आतील बाजूला पोलिसांचा तीन वर्तुळाकारात बंदोबस्त असेल.
बातम्या आणखी आहेत...