आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhagwat Remarks Affect On Bihar Polls Result Prakash Ambedkar

भागवतांच्या वक्तव्यामुळे बिहारचा निकाल बदलेल, प्रकाश आंबेडकर यांचे मत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमदार दत्ता देशमुख यांच्या स्मृतिदिनी बोलताना भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर. समवेत नगराध्यक्ष दुर्गा तांबे, मोहन देशमुख, मिलिंद रानडे. छाया: काशीनाथ गोसावी.
संगमनेर - केवळ विकास या एकमेव मुद्द्याभोवती केंद्रित झालेल्या बिहारच्या निवडणुकीचे चित्र मोहन भागवत यांच्या एका वक्तव्यामुळे बदलले आहे. आरएसएस, भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना त्यांचा अजेंडा परफेक्ट राबवत आहेत. एक नवी समाजरचना ते आणू पाहत असताना त्यांच्यासमोर संविधानाची मोठी अडचण आहे. लोकशाहीतील मतभेद ते द्वेषात पसरवत असल्याने पुरोगाम्यांसमोर वैचारिक बाबासाहेब आंबेडकर मांडण्याची जबाबदारी वाढली आहे, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

संगमनेरमध्ये माजी दिवंगत आमदार दत्ता देशमुख यांच्या २१ व्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कॉम्रेड मिलिंद रानडे होते. नगराध्यक्ष दुर्गा तांबे, दत्ता देशमुख प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन देशमुख, कॉम्रेड केशव कडू, कॉम्रेड जोगळेकर आदी उपस्थित होते.

‘सद्य:स्थितीत पुरोगाम्यांची जबाबदारी’ या विषयावरील व्याख्यानात आंबेडकर म्हणाले, आपल्या देशाचा इतिहास गुलामीचा आहे. या गुलामगिरीविरोधात ज्या ज्या चळवळी उभ्या राहिल्या. त्या कोणत्या ना कोणत्या धाग्याने बांधल्या गेल्या होत्या. सद्य:स्थितीत आपल्यासमोर नव्या सरकारने अनेक आव्हाने उभी केली आहेत. एक सूत्रबद्ध अजेंडा ते राबवत असून हिंदू धर्मावर आधारित देशाची उभारणी केली जात आहे. एम. एन. मंडलिक, केशव कडू, दुर्गा तांबे, मोहन देशमुख यांची भाषणे झाली. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली प्रज्ञा भालेराव, शिवाजी कांबळे, रवी लांडगे, गणेश बिडवे, प्रवीण घुले, एकनाथ भागवत, रेवणनाथ देशमुख, शिवा, भिवा तुपसुंदर, संदीप गोरे यांनी गीतांद्वारे लोकजागर घडवला.
पुरोगाम्यांनी एकत्र येऊन नवा अजेंडा देण्याची गरज
राजकीयदृष्ट्या सध्याची स्थिती सर्वात वाईट आहे. गुजरात नरसंहारावेळी कोणतीच कारवाई करणारे नरेंद्र मोदी आज देशाचे पंतप्रधान झालेत. राजकीय, सामाजिक समतेची मूल्ये यावर आधारीत असलेल्या घटनेच्या तत्त्वाशी संघ, भाजप, हिंदुत्ववादी संघटनांचा कोणताच संबंध नाही. जातीवर आधारीत व्यवस्था ते आणू पाहत आहे. हेच पुरोगामी चळवळीसमोरचे मोठे आव्हान आहे. त्यासाठी पुरोगाम्यांना एकत्रित येऊन एक नवा अजेंडा देण्याची गरज आहे. मिलिंद रानडे, सरचिटणीस लालनिशाण पक्ष.