आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भक्तिगीतांच्या मैफलीत रंगले विदेशी कलावंत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - श्रीसमर्थ रामदास स्वामी पादुका प्रचार दौºयानिमित्त महाजन गल्लीतील गायत्री मंदिराच्या प्रांगणात सुरू असलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. समर्थांच्या पादुकांच्या दरबारात स्थानिक कलावंतांच्या भक्तिगीतांच्या मैफिली रंगू लागल्या आहेत. त्यात
विदेशी कलावंतांनी मैफिलीत सहभाग घेऊन समर्थांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे मनोगत व्यक्त करून पादुकांसमोर नतमस्तक होण्यात धन्यता मानली.
समर्थ रामदास स्वामींच्या पादुकांचे अधिष्ठान असलेल्या गायत्री मंदिराच्या प्रांगणात नियोजित दैनंदिन कार्यक्रम सुरू आहेत. शुक्रवारी मकरंद खरवंडीकर यांच्या भक्तिगीत गायनाने मैफिलीस प्रारंभ झाला. माधवी ऋषी व राजश्री इनामदार यांचे भक्तिगीत गायन झाले. त्यांना सूरज शिंदे यांनी तबल्याची तर प्रकाश शिंदे यांनी हार्मोनियमची साथ दिली. इनामदार यांनी केशवा माधवा, आकाशी झेप घे रे पाखरा, दास रामाचा हनुमंत नाचे, अविरत ओठी याचे नाम अशी भक्तिगीत गाऊन उपस्थितांना भक्तिरसाची अनुभूती मिळवून दिली. त्यांचा सुमधुर आवाज, गाण्याचे स्वर, आवाजातील चढउतार, भक्तिगीत गातानाचे सात्वीक भाव, श्रद्धापूर्ण हावभाव भाविकांची दाद मिळवून देणारे होते. ऋषी यांनी शंभुशंकरा या गीताने मैफिलीस प्रारंभ केला. श्रीरामचंद्र कृपालू हे गीतही त्यांनी गायिले.

विदेशींचा सहभाग लक्षवेधी
नादब्रह्म संगीत विद्यालयाचे पवन नाईक यांचे भक्तिगीत गायन विदेशी कलावंतांच्या सहभागाने लक्षवेधी झाले. पवन नाईक यांनी चाहे कृष्ण कहो या राम, तन तंबोरा तार मन या हिंदी गीतांचे सादरीकरण करताना भगवान श्रीकृष्ण आणि प्रभू रामचंद्र हे दोघे एकच कसे आहेत? त्यांनी जगाच्या उद्धाराचे काम कसे केले? जगामध्ये ही दोनच नावे सुंदर कशी आहेत? शरीर हे वाद्य कसे? अशा प्रश्नांचे नेमकेपणाने गुज सांगितले.