आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhandara And Mula Cant Disposal Water In Jaykwadi Dam

भंडारदरा मुळातून ३१ मेपर्यंत जायकवाडी धरणासाठी पाणी नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर / शिर्डी - गोदावरी,प्रवरा तसेच मुळा धरण समूहातील वरच्या भागातील धरणांतून जायकवाडीसाठी ३१ मे २०१५ पर्यंत पाणी सोडू नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने जलप्राधिकरणाला दिले आहेत. संगमनेरचा भाऊसाहेब थोरात साखर कारखाना आणि हरिश्चंद्र फेडरेशन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विठ्ठलराव विखे कारखान्याच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर निर्णय देताना न्यायालयाने मंगळवारी (१० मार्च) हे आदेश दिल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ्यात दिलासा मिळाला.

जायकवाडीसाठी पाणी सोडल्यास लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांंना पिण्यासाठी शेतीसाठी पाणी राहणार नाही. सातत्याने गेल्या दोन वर्षांपासून जायकवाडीसाठी पाणी सोडले जात असल्याने यापुढे धरणातून पाणी सोडू नये, असे आदेश न्यायालयाने द्यावेत यासाठी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात कारखाना आणि हरिश्चंद्र पाणी पुरवठा फेडरेशनच्या वतीने दोन स्वतंत्र याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. २४ फेब्रुवारीला जलप्राधिकरणाचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. त्यानंतर या याचिकांवर न्यायालयाने मंगळवारी निर्णय दिला. कारखान्याच्या वतीने अध्यक्ष माधवराव कानवडे फेडरेशनच्या वतीने राजेंद्र गुंजाळ यांनी दाखल केलेल्या याचिकांसाठी अॅड. राजेंद्र कुटे यांनी काम पाहिले. सुनावणीदरम्यान विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे, संचालक शांतीनाथ आहेर, अॅड. अशोक म्हस्के, प्रमोद राहाणे आदी उपस्थित होते.

काय होत्या याचिका
संगमनेरपर्जन्यछायेखाली असल्याने दुष्काळाचा सामना करावा लागतो. नदीकाठच्या शेतकऱ्यांना आधीच हक्काचे पाणी कमी मिळते. यापूर्वी जायकवाडीसाठी पाणी सोडले गेले असून आणखी पाणी सोडल्यास शेतकरी पशुधन उद््ध्वस्त होईल. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊन असंतोष निर्माण होऊ शकतो, असे या याचिकेत म्हटले होते.

थोरात-विखेंत एकमत झाल्याने विरोध अधिक तीव्र
गेल्यावर्षी जायकवाडीसाठी या धरणांतून पाणी सोडण्यात आले. त्यावेळी बाळासाहेब थोरात महसूलमंत्री, तर राधाकृष्ण विखे कृषिमंत्री होते. शिवाय थोरात यांच्याकडे आैरंगाबादचे पालकमंत्रिपदही होते. त्यामुळे मानवतेच्या भावनेतून आैरंगाबादकरांची गरज लक्षात घेऊन त्यांनी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याचे समर्थन केले होते, तर विखे यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. यावेळी पाणी सोडण्याबाबत या दोन्ही नेत्यांत एकमत दिसले. त्यामुळे हा विरोध तीव्र होण्यास मदत झाली.