आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘भंडारदरा’तून ७,७०० क्युसेक पाणी प्रवरा नदीपात्रात सोडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भंडारदरा - भंडारदरा धरणाच्या स्पिल-वे गेटमधून शुक्रवारी हजार ८८० क्युसेक विद्युतगृह क्रमांक - मधून ८२० क्युसेक असे एकूण हजार ७०० क्युसेक पाणी प्रवरा नदीत सोडण्यात आले.
भंडारदरा धरणाची एकूण क्षमता ११ हजार ३९ दशलक्ष घनफूट आहे. धरणातील पाणीसाठा सध्या १० हजार ५२० दलघफू ठेवून अतिरिक्त पाणी सोडण्यात आले. दरम्यान, शुक्रवारी सकाळपासून पुन्हा संततधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे भंडारदरा धरणातील जास्त पाणी सोडण्याची शक्यता आहे, असे जलसंपदा खात्याचे उपविभागीय अभियंता जी. जी. थोरात यांनी सांगितले. गुरुवारी (४ अॉगस्ट) दिवसभरात पांजरे येथे साडेचार इंच (११० मिमी),रतनवाडी येथे २४ मिमी, वाकी येथे ३८ मिमी पावसाची नोंद झाली. भंडारदरा धरणातून वीजनिर्मिती करून एकूण हजार ३१५ दलघफू पाणी सोडले आहे. दररोज २४ तासांठी ७२ दलघफू पाणी वापरले जात आहे. या वीजगृहाची क्षमता १२ मेगावॅट आहे. सलग १८ दिवसांपासून वीजगृह सुरू आहे. कोदणी येथील वीजगृहातून पूर्ण क्षमतेने ३४ मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. सद्यस्थितीत रंधा फॉल धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पश्चिमेकडील शेकडो धबधबे वेगाने कोसळत आहेत. मुळा नदीचा विसर्गही पाच हजार क्युसेकचा असल्याने मुळा धरणातील पाणीसाठा २२ हजार ५९१ दलघफू झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...