आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘भंडारदरा’त ३७७ दलघफूची आवक, मुसळधार पावसामुळे वेगाने आवक वाढली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भंडारदरा - भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व परिसरात मंगळवारी सायंकाळपासून जोरदार वादळी वार्‍यासह मुसळधार वृष्टी होत असल्याने जनजीवन ठप्प झाले आहे. या तुफानी पावसामुळे १२ तासांत भंडारदरा धरणात तब्बल ३७७ दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली. त्यामुळे धरणातील पाणीसाठा २३८७ दशलक्ष घनफूट झाला. कृष्णावती नदीवरील वाकी जलाशय पूर्ण क्षमतेने भरला आहे.

निळवंडे धरणाचाही पाणीसाठा ९९५ दशलक्ष घनफूट झाला आहे. १२ तासांत निळवंडे धरणात २१८ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली. अवघ्या दोन दिवसांत भंडारदरा धरणात मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने धरण वेळेत भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे धरण १५ ऑगस्टला भरण्याची परंपरा आहे.

भंडारदरा धरणाची एकूण क्षमता ११ हजार ३९ दशलक्ष घनफूट असून बुधवार सकाळपर्यंत धरणातील पाण्याने दोन टीएमसीचा टप्पा ओलांडला आहे.
बातम्या आणखी आहेत...