आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भंडारदरा ओव्हरफ्लो; 3 हजार क्युसेक विसर्ग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भंडारदरा - भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील घाटघर येथे तब्बल साडेसात इंच (१८६ मिलिमीटर), तर रतनवाडी येथे चार इंच (९९ मिलिमीटर) पावसाची नोंद झाली. धरण पूर्ण भरल्याने हजार २२८ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे सोमवारी रात्रीपर्यंत निळवंडे धरणात पूर्ण क्षमतेने हजार ५०० दशलक्ष घनफूट साठा ठेवून उर्वरित पाणी प्रवरा नदीपात्रात सोडले जाणार आहे.

मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस होत असल्याने साठा सोमवारी सायंकाळपर्यंत २२ टीएमसीच्या पुढे गेला. या धरणाची क्षमता २६ टीएमसी आहे. २४ टीएमसी पाणीसाठा झाल्यानंतर धरणाचे दरवाजे उघडले जाण्याची शक्यता पाटबंधारे अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

भंडारदराची क्षमता ११०३९ दशलक्ष घनफूट आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याचे जलसंपदा खात्याचे उपविभागीय अधिकारी किरण देशमुख यांनी सांगितले. रविवारी रात्री पाणलोट क्षेत्रातील घाटघर, रतनवाडी येथे मुसळधार पाऊस झाल्याने धरणातील साठा वेगाने वाढला. त्यामुळे सोमवारी पहाटेपासून मुख्य गेटद्वारे हजार ४०० विद्युतगृह क्रमांक मधून ८२० क्युसेक असे एकूण हजार २२८ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. वाकी जलाशयातून ५५६ क्युसेक पाणी प्रवरेस मिळत आहे.
परिसरातील ओढे, मोठे नाले यांचे एकत्रित पाणी हजार ५०० ते हजार क्युसेक पाणी निळवंडे धरणात जात आहे. त्यामुळे निळवंडेही रात्री उशिरापर्यंत भरणार हे स्पष्ट झाले. निळवंडे धरणातून सध्या १३०० क्युसेक आवर्तन सुरू आहे. रतनवाडी येथे पावसाने हजार मिलिमीटरचा टप्पा पार केला. पावसामुळे जनजीवन गारठले आहे. शनिवारी रविवारी मात्र पर्यटकांच्या गर्दीत वाढ झाली होती.

नगर शहरासह दक्षिण भागाला वरदान असणाऱ्या मुळा धरणाच्या पाण्यातही वेगाने वाढ होत आहे. २६ हजार दलघफू क्षमतेच्या (२६ टीएमसी) मुळा धरणात सोमवारी सकाळपर्यंत २१ हजार ६५४ दलघफू साठा झाला होता. मुळा नदीचा कोतूळ येथील विसर्ग हजार ३१० क्युसेकने धरणात जमा होत आहे. धरणात २४ टीएमसी साठा झाल्यानंतर दरवाजे उघडून नदीत पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे.
भंडारदरा
१८२४
घाटघर
३६९७
रतनवाडी
४१७७
पांजरे
२३८४
वाकी
१८५८
(फोटो : गंगापूर धरणातून विसर्ग सुरू झाल्याने नाशकात गोदावरीला आलेला पूर)