आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्युत गृह एकमधून वीजनिर्मितीसाठी सोडले पाणी; भंडारदरा धरण 64 टक्क्यांवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- भंडारदरा धरणात शुक्रवारी 7 हजार 64 दशलक्ष घनफूट (64 टक्के) पाणीसाठा झाला. विद्युत गृह एकमधून वीजनिर्मितीसाठी 850 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे. बारा तासांत 37 दशलक्ष घनफूट पाण्याचा विसर्ग झाला. 24 तासांत 74 दशलक्ष घनफूट विसर्ग होईल. निळवंडे धरणात 2553 दशलक्ष घनफूट साठा आहे. मुळा धरणात 7 हजार 350 क्युसेक्सने आवक सुरू आहे.
या धरणात सध्या 12.5 टीएमसी साठा आहे. शनिवारपर्यंत साठा 50 टक्क्यांपर्यंत जाईल. सर्वच पिकांच्या पेरण्यांना लांबलेल्या पावसाचा फटका बसला असताना कपाशीचे क्षेत्र शंभर टक्क्यांवर पोहोचले आहे. कपाशीच्या एकूण 60 हजार 870 हेक्टर पेरणी क्षेत्राच्या तुलनेत 64 हजार 376 हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. त्या खालोखाल बाजरी व सोयाबीनची पेरणी झाली आहे. खरिपाच्या एकूण 4 लाख 12 हजार 230 हेक्टरपैकी 1 लाख 42 हजार 146 (35 टक्के) हेक्टरवर पेरणी झाली आहे.