आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘भंगारवाले’, ‘अव्यक्त’ लघुपटास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - प्रतिबिंब राष्ट्रीय लघुपट व माहितीपट महोत्सवात अजय थोरात दिग्दर्शित ‘भंगारवाले’ व श्याम शिंदे दिग्दर्शित ‘अव्यक्त’ लघुपटास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

न्यू आर्ट्स महाविद्यालयातील संज्ञापन अभ्यास विभागामार्फत आयोजित या महोत्सवाची सांगता मंगळवारी (18 फेब्रुवारी) सायंकाळी यशवंतराव चव्हाण सभागृहात झाली. दिग्दर्शक प्रसाद नामजोशी व प्रा. सुशोभन पाटणकर यांनी परीक्षण केले. महोत्सवात निवडक 33 लघुपट व माहितीपटांचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थी गटात थोरात यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘भंगारवाले’, तर खुल्या गटात शिंदे यांच्या ‘अव्यक्त’ला प्रथम क्रमांक मिळाला. ‘सॉरी बापू’ या अमित खताळ यांच्या लघुपटास द्वितीय, तर आशुतोष भोसेकर यांच्या ‘दाव’ला तृतीय पारितोषिक मिळाले.

भंगार वेचणार्‍याची कथा
झोपडपट्टीतील भंगार वेचणार्‍या मुलांशी चर्चा केली, त्यावेळी लक्षात आले की, शिक्षण दारापर्यंत येते, पण आर्थिक परिस्थितीमुळे ते घेता येत नाही. या परिस्थितीवर कथा लिहिली. ही कथा एका व्यक्तीची आहे. पुढील काळात शिक्षण पूर्ण करून या क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे.’’अजय थोरात, दिग्दर्शक, भंगारवाले लघुपट