आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhanudas Berade New District Head Of BJP Rural Area

भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी प्रा. भानुदास बेरड यांची निवड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी प्रा. भानुदास बेरड यांची निवड झाली. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गुरूवारी त्यांची निवड जाहीर केली. आमदार स्नेहलता कोल्हे यांची प्रदेश चिटणीसपदी निवड झाली.

भाजपचे जिल्हाध्यक्षपद गेल्या वर्षभरापासून रिक्त होते. लाेकसभा विधानसभा या दोन्ही निवडणुका पक्षाने जिल्हाध्यक्षविनाच लढवल्या. या पदासाठी माजी आमदार चंद्रशेखर कदम, शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर, आसाराम ढूस यांच्यासह अनेक नावे चर्चेत होती. मात्र, प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी प्रा. बेरड यांची निवड केली. गुरूवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी बेरड यांच्या नावाची घोषणा केली.

बेरड पक्षाच्या सरचिटणीस पदावर कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी नगर तालुकाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. कोणत्याही एका गटाच्या बाजूने झुकता त्यांनी समन्वयाने काम केले. त्यामुळेच दानवे यांनी त्यांची निवड केली. पक्षाच्या राज्य कार्यकारिणीत कोपरगावच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांना संधी देण्यात आली आहे. त्यांची प्रदेश चिटणीसपदी निवड करण्यात आली. नगर जिल्ह्यातून राज्य कार्यकारणीवर जाणार्‍या त्या एकमेव आहेत.