आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bharat Sanchar Nigam Limited Krishi Card News In Marathi

पुणे, नािशक, नागपूर या जिल्ह्यांना टाकत कृषीकार्ड योजनेत नगर राज्यात अव्वल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) व कृषी विभागाच्या समन्वयाने जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या ‘महाकृषी ३’ योजनेला नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. या योजनेत नगर बीएसएनएलने पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या मोठ्या जिल्ह्यांना मागे टाकत राज्यात अव्वल क्रमांक पटकावला. जुलैअखेर जिल्ह्यात २८ हजार ९२६ शेतकऱ्यांनी कृिषकार्ड घेतले आहे.
शेतकऱ्यांना कृिषविषयक माहिती व मार्गदर्शन माफक दरात मिळावे, या उद्देशाने बीएसएनएलने ही योजना अंमलात आणली आहे. ‘महाकृषी १ व २’ या योजनेला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात सुमारे १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांनी कार्ड घेतले होते. काही काळ ही योजना बीएसएनएलने बंद केली होती. ९ फेब्रुवारीपासून ‘महाकृषी ३’ या योजनेला नव्याने सुरुवात झाली. याचा कालावधी सहा महिन्यांचा (७ आॅगस्टपर्यंत) होता. मात्र, शेतकऱ्यांकडून अपेक्षेपेक्षा जास्त मिळत असलेला प्रतिसाद पाहता या योजनेचा कालावधी ६ फेब्रुवारी २०१५ पर्यंत वाढवण्यात आला आहे.
या योजनेंतर्गत ग्राहकांना हवामानविषयक सल्ला, खते, बी-बियाण्यांची उपलब्धता, गुणवत्तेची माहिती मिळते. या योजनेंतर्गत वीस रुपयांत सीमकार्ड मिळते. त्यासाठी १२८ रुपयांचे रिचार्ज दरमहा आवश्यक आहे. या योजनेतील ग्राहकांशी मोफत बोलता येते. प्रत्येक शेतकऱ्यास या योजनेंतर्गत तीन सीमकार्ड दिले जातात.

महिनाभराच्या कालावधीतील सातबारा उतारा आवश्यक आहे. कृषी विभागाचा नमुन्यातील दाखला, रहिवासी पुरावा व रंगीत फोटो, तसेच कृषी अधिकाऱ्याचा दाखला ही कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे.
जिल्हानिहाय ग्राहकांची संख्या
{अहमदनगर २८,९२६
{ धुळे २७,७७१
{ बीड २४,९४६
{ औरंगाबाद २३,११४
{ नािशक १९,४४१
{ सोलापूर १८,६६९
{ कोल्हापूर १८,६२२
{ पुणे १४,७०१
{ जळगाव १२,८१२
{ नागपूर ३,२९७
फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
या योजनेच्या तिन्ही टप्प्यांत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. शेतकऱ्यांचा प्रतिसाद पाहता या योजनेला सहा फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेचा फायदा एकाच कुटुंबातील तिघांना घेता येतो. तसेच शेतकऱ्यांना शेती सल्ल्यासाठी किंवा पिकांबाबत माहिती घेण्यासाठी कृषी अधिकारी, कर्मचारी, शेतकऱ्यांसोबत संवाद साधणे शक्य व्हावे यासाठी ही योजना बीएसएनएलने सुरू केली आहे. या योजनेचा पल्सरेट हा साठ सेकंदाचा आहे. इतर नेटवर्कसाठी प्रति एसएमएसला ४० पैसे आकारण्यात येतील. ज्या शेतकऱ्यांनी कृिषकार्ड घेतले नाही, त्यांनी बीएसएनएलच्या कार्यालयाशी किंवा नजिकच्या ग्राहक केंद्राशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा.”
डी. एस. ठुबे, उपमंडल अभियंता (विपणन), बीएसएनएल.