आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारती कला प्रदर्शनात विकास कांबळे यांचे प्रात्यक्षिक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पुणे येथील भारती कला महाविद्यालयात माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित वार्षिक कला प्रदर्शनात शिल्पकलेचे प्रात्यक्षिक सादर करण्याची संधी नगरचे युवा शिल्पकार विकास प्रकाश कांबळे यांना मिळाली. या कार्यक्रमाचा प्रारंभ ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून िचत्रकार बुवा शेट्ये, पर्यावरण विभागाचे डॉ. बरुचा व प्राचार्य अनुपमा पाटील उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांकरितानिवडक मान्यवर कलाकारांच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. भारती कला महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले नगरचे युवा शिल्पकार विकास कांबळे यांना त्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. प्राचार्य पाटील यांचे शाडूमातीतील शिल्प त्यांनी तयार केले. नंतर विद्यार्थ्यांना शिल्पकलेविषयी मार्गदर्शन केले. अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते विकास यांचा यथोचित गौरव करण्यात आला.