आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रकबाजी करणाऱ्यांना शेतकऱ्यांचे देणेघेणे नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर - भंडारदरा, निळवंडेतून जायकवाडीकडे जाणाऱ्या पाण्याने संगमनेरची सीमा आेलांडली असताना हे पाणी पेटले आहे. एकीकडे पाणी सोडण्यास विरोध करणाऱ्या याचिका न्यायालयाने फेटाळल्या असताना दुसरीकडे यावरून राजकीय पत्रकबाजी सुरू झाली. पत्रकबाजी करणाऱ्यांना शेतकऱ्यांशी काहीही देणेघेणे नसल्याची टीका सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याचे अध्यक्ष माधवराव कानवडे यांनी केली.
जिल्ह्यातील धरणांतून पाणी सोडण्यास विरोध करणाऱ्या प्रवरानगर साखर कारखाना आणि हरिश्चंद्र फेडरेशनच्या दोन स्वतंत्र याचिका सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळत यासंबंधीचा निर्णय मुंबई हायकोर्टाने घ्यावा, असे निर्देश न्यायालयाने दिले. त्यामुळे राधाकृष्ण विखे व बाळासाहेब थोरात या दोन माजी मंत्र्यांचे पाणी रोखण्याचे प्रयत्ननिष्फळ ठरले. माजी मंत्री मधुकर पिचड यांनीही याप्रश्नी विरोधाची भूमिका घेतली असताना विरोधी गटाकडून या नेत्यांवर टीका सुरू झाली आहे.

या टीकेला कानवडे यांनी आक्षेप घेत गेल्यावर्षी मराठवाड्याला दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्याची गरज होती. त्यामुळे तत्कालीन आघाडी सरकारने सकारात्मक भूमिका घेतली होती. यावेळी उलट परिस्थिती असून जायकवाडीत पुरेसा पाणीसाठा शिल्लक आहे. अशा परिस्थितीत नगरच्या धरणातून जायकवाडीसाठी पाणी देणे या धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांवर अन्यायकारक आहे. पाण्याच्या मूलभूत प्रश्नावर सर्वांनी एकत्र येण्याऐवजी ज्या लोकांना शेतकऱ्यांशी काही देणे घेणे
नाही असे लोक प्रसिद्धीसाठी पत्रकबाजी करत आहेत. त्यांच्या पत्रकामागील बोलवते धनी वेगळेच असल्याची टीका केली.

समन्यायी पाणीवाटप पद्धतच चुकीची आणि अन्यायकारक आहे. पावसाची सरासरी पाहून निर्णय घेणे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. संगमनेरचे पर्जन्यमान कमी असल्याने गोदावरी खाेऱ्यातील कमी पावसामुळे या भागात धरणांची निर्मिती झाली.
माजी मंत्री थोरात व पिचड यांच्या प्रयत्नातून निळवंडे काम झाले. निळवंडे धरणाचे कालवे सत्तर टक्के पूर्ण झाले अाहे. संगमनेरमधील अनेक गावे अद्यापही पाणीटंचाईचा सामना करत आहे. तालुक्यातील सर्वच गावांची आणेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आहे.