आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhausaheb Wachaure News In Marathi, Shirdi Lok Sabha Constituncy, Congress

भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचाराच्या समारोपासाठी आयोजित थोरातांची सभा रद्द

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर - काँग्रेस आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना ही निवडणूक जड जाण्याची चिन्हे आहेत. त्यांच्या प्रचाराच्या समारोपासाठी येथे आयोजित केलेली महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची सभा रद्द करण्याची नामुष्की ओढवली. रद्द झालेल्या सभेमुळे वेगळीच राजकीय चर्चा रंगली आहे.


संगमनेरमध्ये निवडणूक आहे असे वातावरण शेवटपर्यंत जाणवले नाही. वाकचौरेंविषयी नाराजी असतानाही महसूलमंत्री थोरात यांनी एकहाती किल्ला लढवला. तथापि, त्याचा कितपत परिणाम होतो हे निकालानंतरच समोर येणार आहे.
मंगळवारी प्रचाराच्या सांगतेसाठी संगमनेरमध्ये महसूलमंत्री थोरात, कोपरगावमध्ये मुकुल वासनिक, कोल्हारमध्ये मुजफ्फर हुसेन व र्शीरामपूरमध्ये नितीन राऊत यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले होते. संगमनेरच्या सभेस स्वत: वाकचौरे उपस्थित राहणार होते. मात्र, दुपारी तीन वाजता होणारी ही सभा अचानक रद्द करण्यात आली. पण त्याची माहिती न देण्यात आल्याने सभेसाठी नवीन नगर रस्त्यावर आलेल्या लोकांची निराशा झाली. न झालेल्या या सभेची राजकीय चर्चा रंगली होती. प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ काढत होता.


कोकणात उद्भवलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वादानंतर त्याचे पडसाद अन्य मतदारसंघांतही जाणवत आहेत. नाशिकमध्ये काँग्रेसचे आमदार माणिक कोकाटे यांनी राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांना मदत न करण्याचा निर्णय घेतल्याने मध्यस्थी करण्यासाठी संगमनेरातील दौरा अर्धवट सोडून थोरात यांना नाशिकला जावे लागल्याची माहिती देण्यात आली. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आता दोन्ही पक्ष अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


संगमनेर, अकोल्याची भूमिका स्पष्ट नाही
दक्षिणोत विखे यांनी आघाडीचा धर्म न पाळता उमेदवार राजीव राजळे यांना मदत करण्याऐवजी बी. जी. कोळसे यांचे काम करण्याचे आदेश दिल्याने त्याचे परिणाम शिर्डीतही जाणवत आहेत. राजळे हे मंत्री थोरात यांचे भाचे असल्याने संगमनेरमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. पालकमंत्री मधुकर पिचड यांनी सोमवारच्या राहुल गांधींच्या सभेकडेही केवळ याच कारणावरून पाठ फिरवली होती. दक्षिणोत जर विखे आघाडीला मदत करणार नसतील, तर शिर्डीत आम्ही त्यांना का मदत करावी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केल्याची माहिती मिळाली.