आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाकचौरेंचा आज कॉँग्रेस प्रवेश शिवसेनेकडून शिर्डीत आंदोलन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी - शिवसेनेचे शिर्डीतील खासदार भाऊसाहेब वाकचौरे सोमवारी काँग्रेसमध्ये अधिकृतरीत्या प्रवेश करत आहेत. शिवसैनिकांनी पुतळा जाळून त्यांचा निषेध केला, तर कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत पुतळा दहन करणार्‍यांचा निषेध नोंदवला. दरम्यान, ‘पुतळे जाळणे बंद करा अन्यथा ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी होतील’, असा इशाराही शिर्डीचे नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांनी दिला.

गेल्या काही दिवसांपासून कॉँग्रेसशी जवळीक साधलेल्या वाकचौरे यांनी मागील आठवड्यात मुंबईत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंची भेट घेतली होती. मात्र त्या वेळी संसद अधिवेशन सुरू असल्यामुळे तांत्रिक अडचण उद्भवू नये म्हणून त्यांनी प्रवेश करणे पुढे ढकलले होते. आता सोमवारी र्शीरामपूरमध्ये होणार्‍या मेळाव्यात ते कॉँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करतील.

दरम्यान, वाघचौरेंच्या निषेधार्थ शनिवारी शिवसैनिकांनी शिर्डीत त्यांचा पुतळा जाळला होता. पक्षाशी गद्दारी करणार्‍यांना धडा शिकवू, असा इशाराही शिवसैनिकांनी दिला होता. त्याचे पडसाद रविवारी उमटले. वाकचौरेंच्या सर्मथनार्थ कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी नगर- मनमाड मार्गावर रास्ता रोको करत शिवसेनेचा निषेध केला. त्यामुळे दोन्ही पक्षात यापुढे तणावाचे वातावरण निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

केंद्रात सरकार कॉंग्रेसचेच
शिर्डी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठीच आपण कॉंग्रेस पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आपण कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा ही केली आहे. साईबाबांच्या नावाने शिर्डी मतदारसंघाची ओळख देशात आहे, तशी ती विकास कामांच्या माध्यमातून व्हावी, यासाठीच आपण कॉंग्रेसचा ‘हात’ पकडला असल्याचे वाकचौरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

विचार कसे जाळणार
शिर्डी मतदारसंघ हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे. येथे शिवसेनेसारख्या जातीय पक्षाला अजिबात थारा नाही. वाक् चौरे अल्पसंख्यांक आहेत. त्यांचे पुतळे जाळले तरी त्यांचे विचार कोणीही जाळू शकत नाही, असे नगराध्यक्ष कैलास कोते यांनी नमूद केले.