आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhausaheb Wakchaure News In Marathi, Congress, Shirdi Lok Sabha Constituncy

भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचाराचा ताफा ग्रामस्थांनी हुसकावला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोले - तालुक्यातील विविध गावांतून गेल्या महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे बाधित शेतकर्‍यांना शासनाने ठेंगा दाखवल्याचे उघड झाले आहे. परखतपूर (ता. अकोले) येथे काँग्रेस आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारासाठी रविवारी (6 एप्रिल) आलेल्या वाहनांचा ताफा गावकर्‍यांनी हुसकावून लावला. शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय मतदान न करण्याचा निर्णय घेण्यात आला.
तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने डाळिंब, द्राक्षे, कांदे, टोमॅटो, गहू, घास, मका व भाजीपाल्याचे नुकसान झाले. गारपिटीचा तडाखा 24 गावांना बसला. या गावातून महसूल, कृषी व पंचायत समिती कर्मचार्‍यांनी पंचनामे केले. मात्र पंचनाम्याच्या प्रती शेतकर्‍यांना न देता त्यांच्या फक्त स्वाक्षरी व अंगठे घेऊन वरिष्ठांना अहवाल सादर केले. मात्र, आता प्रत्यक्षात महसूलकडे 24 पैकी 14 गावांसाठीच नुकसान भरपाई वाटपाची यादी मिळाली. उर्वरित 10 गावांतील शेतकरी भरपाई न आल्याने चिंताग्रस्त झाले आहेत. नुकसान भरपाई वाटपाच्या पहिल्या यादीत परखतपूरचा समावेश नसल्याने संतप्त परखतपूर ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्काराचे अस्त्र उगारले आहे. नंदकुमार वाकचौरे, दत्तात्रेय वाकचौरे, सुरेश भिसे, दिनकर देशमुख, दौलत देशमुख, वेणूनाथ देशमुख, नवनाथ मोरे, सुरेश देशमुख, आजी माजी सरपंच व सदस्यांनी हा निर्णय घेतला आहे
प्रशासनावर राजकीय दडपण
गारपीटग्रस्त 24 पैकी 14 गावांनाच नुकसान भरपाई मंजूर झाली. परखतपूरला मोठे नुकसान झाले. त्यांचे पंचनामेदेखील झाले. मात्र परखतपूरला जाणीवपूर्वक नुकसान भरपाई मिळू न देण्यासाठी प्रशासनावर राजकीय दडपण आणले आहे. - नंदकुमार वाकचौरे, शिवसेना, प्रवरा विभागप्रमुख.