आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhausaheb Wakchaure News In Marathi, Congress, Shirdi Lok Sabha Seat

भाऊसाहेब वाकचौरेंसमोर आव्हान मताधिक्य टिकवण्याचे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेवासे - लोकसभेच्या निवडणुकीत नेवासे मतदारसंघात काँग्रेस आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यापुढे मागील पंचवार्षिकचे मताधिक्य टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे. गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढवलेल्या वाकचौरे यांना नेवासे तालुक्यातून 56 हजार 762, तर आघाडीचे उमेदवार रामदास आठवले यांना 41 हजार 355 मते मिळाली होती.


नेवासे तालुक्यात यावर्षी वाकचौरे यांना विरोध करण्याचे लोन सर्व मतदारसंघात पसरले आहे. आमदार शंकरराव गडाख आणि काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे हे एकत्र फिरत नसतानाही तालुक्यात आजपर्यंत सुमारे 108 गावांत प्रचार केला आहे. आमदार गडाख यांनी गावोगावी भेटी देऊन प्रमुख कार्यकर्त्यांना प्रचारात सक्रिय करण्यासाठी बैठका घेतल्या, तर तालुकाध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे यांनी बूथ कमिटीवर नेमलेल्या कार्यकर्त्यांना सक्रि य करण्यासाठी गावोगाव बैठका घेतल्या. तरीही वाकचौरे यांच्यावरील रोष सामान्य जनतेत दिसून येत आहे. या परिस्थितीत वाकचौरे यांना मागील पंचवार्षिकमध्ये त्यांना मिळालेले सुमारे 15 हजारांचे मताधिक्य टिकवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. वाकचौरे यांनी नेवासे तालुक्यात पाच वर्षांत 69 गावांत सभामंडप, 88 ठिकाणी हायमॅक्स, 38 शाळांना संगणक, नऊ ठिकाणी विंधन विहिरी केल्या आहेत. याशिवाय एका पगाराची रक्कम चार तीर्थक्षेत्रांना दिली आहे.