आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुईकोट किल्ल्याचा इतिहास रविवारी उलगडणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगरशहर जिल्ह्यातील पर्यटनविकासाला चालना देण्यासाठी "स्वागत अहमदनगर'तर्फे (सोसायटी वर्किंग फॉर अवेरनेस अँड ग्रोथ ऑफ अहमदनगर टुरिझम) येत्या रविवारी (३१ जानेवारी) "डिस्कव्हर नगर' हा नवा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. या अंतर्गत ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याला भेट आयोजित करण्यात आली आहे.
नगर परिसरातील ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाच्या पर्यटनस्थळांची ओळख करून देण्यासाठी "डिस्कव्हर नगर'च्या माध्यमातून वर्षभर प्रयत्न केले जाणार आहेत. हा उपक्रम विनामूल्य असून कोणालाही यात सहभागी होता येईल.
या उपक्रमाचा प्रारंभ ३१ जानेवारीला सकाळी साडेआठ वाजता किल्ल्यापासून होईल. किल्ल्याचा इतिहास, तिथे घडलेल्या महत्त्वाच्या घटना, महाल याविषयीची माहिती यावेळी दिली जाईल.
"पर्यटन मार्गदर्शक' म्हणून करिअर करू इच्छिणाऱ्यांनाही "डिस्कव्हर नगर' अंतर्गत मार्गदर्शन केले जाणार आहे. महाविद्यालयीन युवक-युवतींना यातून फावल्या वेळेत रोजगाराची संधी मिळू शकेल. अधिक माहितीसाठी दीपक रामदिन (९४ ०३ ६१ ९९ ७८), रवि रासने (९८ ५० ४१ ४१ ६०) यांच्याशी संपर्क साधून आपल्या नावाचा एसएमएस करावा, असे आवाहन अमेय मुदकवी, अरूण कडूस यांनी केले आहे.

हुतात्मा स्मारकात उद्घाटन
हुतात्मा स्मारकातील करविरनिवासी चौथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी "स्वागत अहमदनगर' संस्थेची स्थापना करण्यात आली. नगर शहराच्या सर्वांगीण पर्यटनविकासासाठी कटिबद्ध होण्याचा, तसेच या उपक्रमात जास्तीत जास्त नगरकरांनी सहभागी करून घेण्याचा निर्धार करण्यात आला.