आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनी शिंगणापुरकडे जाणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या महिला आंदोलकांना पोलिसांनी रोखले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भूमाता ब्रिगेडच्या महिलांना नगरजवळ सुपा येथे रोखण्यात आले. - Divya Marathi
भूमाता ब्रिगेडच्या महिलांना नगरजवळ सुपा येथे रोखण्यात आले.
नगर - शनी शिंगणापुरात महिलांना पूजेसाठी बंदीच्या विरोधात भूमाता ब्रिगेड या महिला संघटनेने प्रजासत्ताकदिनी विरोध मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता.या पार्श्वभूमीवर शिंगणापुरात शनैश्वर देवस्थानाने चाैथऱ्याजवळ कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. परंतु भूमाता ब्रिगेडच्या महील कार्यकर्त्यांना पुणे-नगर मार्गावरील सुपा येथे आडवण्यात आले. त्यानंतर महिला आंदोलकांना पोलिसांनी आडवल्यामुळे त्यांनी तेथेचे ठिय्या आंदोलन सुरु केले. यामुळे तेथील परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. त्यानंतर पोलिसांनी सर्व महिला आंदोलकांना पुण्याकडे नेल्याचे समजते.

काही दिवसांपूर्वी एका युवतीने शनी शिंगणापुरात चाैथऱ्यावर जाऊन दर्शन घेतले हाेते. तेव्हापासून या वाद उद्भवला अाहे. दरम्यान, पुण्यातील भूमाता रणरागिणी ब्रिगेडने शनी चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्याचे जन आंदोलन हाती घेतले असून त्यासाठी २६ जानेवारी राेजी शिंगणापुरात धडक देण्याचा इशाराही दिला होता. त्याला देवस्थानसह विविध महिला संघटनांनी विरोध दर्शविला. आंदोलक महिलांना आपल्या स्टाइलने उत्तर देण्याचा इशारा स्थानिक हिंदुत्ववादी संघटनांनी दिला आहे. तर महिलांना समान हक्क असल्यामुळे आंदोलन करण्याच्या निर्णयावर तृप्ती देसाई ठाम आहेत.