आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांबळे यांच्या पेंटिंग्जचे 'बिग बीं'कडून कौतूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: शुभंकर व मोना कांबळे यांचे चित्र पाहताना महानायक अमिताभ बच्चन.
नगर - प्रसिद्ध शिल्पकार व चित्रकार प्रमोद कांबळे, शुभंकर व मोना कांबळे यांनी साकारलेल्या पेंटिग्जचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी कौतूक केले. कांबळे कुटुंबीयांनी बच्चन यांचे पेंटिग रेखाटले होते.

शमिताभ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईतील गोरेगाव येथील फिल्मसिटीत आयोजित कार्यक्रमात हा योग जुळून आला. कांबळे कुटुंबीयाला व्यक्तिंचे पेंटिग्ज व पेन्सिलचित्र काढून त्यांचा संग्रह करण्याचा छंद आहे. या कार्यक्रमात बच्चन, अभिनेता कमल हसन यांची मुलगी अक्षरा हसन व अभिनेता रजनीकांत यांचा जावई धनुष आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शिल्पकार शुभंकर व मोना कांबळे हे दाम्पत्य उपस्थित होते. आठवडाभरापूर्वी प्रमोद कांबळे यांनी शमिताभ चित्रपटातील अमिताभ यांचे नाइफ पेंटिग प्रकारातील अॅक्रालिक रंगातील चित्र माऊंट बोर्डवर साकारले. शुभंकर व मोना यांनी याच आकारातील अमिताभ यांची गाजलेल्या विविध चित्रपटातील भावमुद्रा चित्रमालिकेच्या रुपात मिक्समिडीया प्रकारात साकारली. भूतकाळातील अजरामर भूमिकांचे अवलोकन करणा-या अमिताभ यांची भावमुद्राही शुभंकरने रेखाटली होती.

प्रमुख कार्यक्रम संपल्यानंतर शुभंकर व मोना यांनी अमिताभ यांची भेट घेऊन कांबळे कुटुंबीयांनी साकारलेले पेटिंग व मिक्समिडिया चित्रमालिका दाखवली. दोन्ही चित्र पाहून अमिताभ अवाक झाले. चित्र साकारणा-यांचे भरभरून कौतूक करून पेंटिग्जवर आनंदाने स्वाक्षरी केली. कांबळे कुटुंबीयाच्या भावी वाटचालीस त्यांनी शुभेच्छाही दिल्या.