आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Big Set Back To Minister Ram Shinde In Jamkhed Municipal Council

जामखेड नगर परिषदेत मंत्री राम शिंदेंना जोरदार धक्का, राष्ट्रवादीला सर्वाधिक १० जागा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामखेड नगर परिषद निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर जल्लोष करताना विजयी उमेदवार. छाया : अशोक वीर.
जामखेड - जामखेड नगर परिषदेच्या पहिल्याच निवडणुकीत स्थानिक आमदार जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्ष - शिवसेना - रिपाइं युतीचा दारुण पराभव झाला. २१ पैकी १० जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला. शेवगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा, भाजपला ८, तर जागांवर अपक्षांना विजय मिळाला. बहुमतासाठी अपक्षांची मदत घ्यावी लागणार असल्याने अपक्षांचा भाव वधारला अाहे.

जामखेड येथील निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली होती. गृह राज्यमंत्री राम शिंदे यांचा हा मतदारसंघ असल्याने त्यांची शक्तिपरीक्षा यानिमित्ताने होणार होती. वर्षभरातील त्यांच्या कामावर जामखेडकर समाधानी नसल्याचे नगर परिषदेच्या निवडणुकीत मिळालेल्या कौलावरून स्पष्ट झाले. जामखेडला भाजपला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेना चार, मनसे एक अपक्ष तीन असे अन्य बलाबल आहे.

माजी मंत्री सुरेश धस यांची व्यूहरचना यशस्वी : जामखेड नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक माजी मंत्री सुरेश धस यांची व्यूहरचना यशस्वी ठरली. विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर मंत्री शिंदे यांनी जामखेडमध्ये तळ ठोकूनही त्यांना नगर परिषद निवडणुकीत सत्ता मिळवण्यात अपयश आले. दरम्यान, मंत्री शिंदे यांनी हा पराभव मान्य केला असून पराभवाची कारणे शोधून आत्मचिंतन करू, असे त्यांनी सांगितले.

विजयी उमेदवार : प्रभाग एक - प्रीती विकास राळेभात (अपक्ष), प्रभाग दोन - दिगंबर गुलाब चव्हाण (शिवसेना), प्रभाग तीन - सुरेखा भाऊराव राळेभात (राष्ट्रवादी), प्रभाग चार - विद्या राजेश वाव्हळ (राष्ट्रवादी), प्रभाग पाच - सुमन अशोक शेळके (राष्ट्रवादी), प्रभाग सहा - सय्यद शामीर लतीफ (शिवसेना), प्रभाग सात - लता संदीप गायकवाड (राष्ट्रवादी), प्रभाग आठ - गुलशन हिरामण अंधारे (राष्ट्रवादी), प्रभाग नऊ - राजश्री मोहन पवार (अपक्ष), प्रभाग दहा - संदीप सुरेश गायकवाड (राष्ट्रवादी), प्रभाग अकरा - अर्चना सोमनाथ राळेभात (भाजप), प्रभाग बारा - कमल महादेव राळेभात (शिवसेना), प्रभाग तेरा - अमित अरुण चिंतामणी (भाजप), प्रभाग चौदा - खान फरिदा अासिफ (राष्ट्रवादी), प्रभाग पंधरा - बिभीषण श्यामराव धनवडे (मनसे), प्रभाग सोळा - वैशाली ज्ञानेश्वर झेंडे (भाजप), प्रभाग सतरा - कुरेशी मेहरुन्निसा शफी (राष्ट्रवादी), प्रभाग अठरा - ॠषिकेश बांबरसे (शिवसेना), प्रभाग एकोणीस - गणेश उत्तम आजबे (राष्ट्रवादी), प्रभाग वीस - निखिल मुकुंद घायतडक (राष्ट्रवादी), प्रभाग एकवीस - महेश भारत निमोणकर (अपक्ष).
शेवगाव : भाजपचे प्रयत्न फाेल
शेवगाव नगर परिषदेच्या २१ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्या. भाजपला ८, तर जागांवर अपक्षांना विजय मिळाला. त्यामुळे बहुमतासाठी अपक्षांची मदत घ्यावी लागणार असून अपक्षांचा भाव वधारला अाहे. अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करून पहिला नगराध्यक्ष करण्याचा दावा राष्ट्रवादी करत आहे.

शेवगावची नगर परिषद ताब्यात घेण्यासाठी भाजपने पूर्ण ताकद उभी केली होती. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार राजीव राजळे, दिलीप लांडे शहरात तळ ठोकून होते. तरीही त्यांना साधा बहुमताचा आकडा गाठता आला नाही. भाजपची अंतर्गत गटबाजी उघड झाल्याने निकालावर त्याचा परिणाम दिसला. दिलीप लांडे यांनी प्रतिष्ठेचा केलेल्या प्रभाग १० प्रभाग १३ मध्ये दारुण पराभव स्वीकारावा लागला. राष्ट्रवादीने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता.