आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौण खनिजातून मिळणार यंदा वाढीव २४ कोटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - वाळूसहगौण खनिजाच्या महसुलाचे ९२ कोटींचे उद्दिष्ट यंदा जलि्हा प्रशासनाला देण्यात आले अाहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २४ कोटींचे अधिक उद्दिष्ट असले, तरी १७९ वाळूसाठ्यांपैकी केवळ २५ साठ्यांचा ललिाव झाल्याने हे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
नेवासे, पारनेर, श्रीगोंदे, संगमनेर, अकोले, कर्जत, जामखेड, श्रीरामपूर, राहुरी, पाथर्डी शेवगाव या तालुक्यांमधील मुळा, प्रवरा, गोदावरी, भीमा सीना या नदीपात्रांमध्ये प्रशासनाचे अधिकृत १७९ वाळूसाठे आहेत. या साठ्यांच्या ललिावातून प्रशासनाला दरवर्षी कोट्यवधींचा महसूल मिळतो. या साठ्यांच्या विक्रीसाठी प्रशासनाने आतापर्यंत तब्बल आठवेळा ललिाव घेतले. तथापि, त्यापैकी केवळ २५ वाळूसाठ्यांचे ऑनलाइन लिलाव झाले अाहेत. १५३ साठ्यांचे लिलाव व्हायचे आहेत. २५ वाळूसाठ्यांच्या लिलावातून प्रशासनाला केवळ कोटी ७६ लाखांचा महसूल मिळाला आहे. वाळूसह गौण खनजिाच्या महसुलाचे प्रशासनाला यंदा ९२ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. गेल्या दोन महिन्यांत कोटी ३० लाखांचा महसूल जमा झाला आहे.

गेल्या वर्षी जलि्हा प्रशासनाला ६८ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ६२ कोटी ३० लाखांचा महसूल जमा करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २४ कोटींचे जास्त उद्दिष्ट देण्यात आले आहे. तथापि, सर्व वाळूसाठ्यांचे ललिाव झाल्याने २४ कोटींचा अधिक महसूल जमा करण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

कोटी ११ लाखांचा दंड
वाळूचोरी प्रकरणातून दोन महिन्यांत कोटी ११ लाख दंड वसूल करण्यात आला. एप्रलि मे महिन्यात २०९ जणांवर कारवाई करण्यात आली. एप्रलि महिन्यात ९५ जणांवर कारवाई करून ३५ लाख ८३ हजार ४८५ रुपयांचा, तर मे महिन्यात ११४ जणांवर कारवाई करून ७५ लाख ३० हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

अनधिकृत उपशावरील कारवाई थंडावली
तीनमहिन्यांपूर्वी मुळा, प्रवरा, गोदावरी, भीमा सीना या नद्यांच्या पात्रातून अनधिकृतपणे वाळूउपसा करणाऱ्यांविरुध्द महसूल पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई सुरू करून वाहने पकडून दंडात्मक कारवाई केली होती. मात्र, सध्या ही कारवाई थंडावली आहे. अधिकृत वाळूसाठ्यांचे ललिाव झाल्याने जिल्ह्यात चोरट्या मार्गाने वाळूउपसा सुरूच आहे.

वाळूचोरी रोखण्यासाठी १५ पथके नियुक्त
^प्रत्येकतालुक्यात अवैध वाळूउपसा वाळू वाहतूक रोखण्यासाठी प्रांताधिकारी तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली १५ पथके स्थापन करण्यात आली आहेत. यंदाच्या वर्षी गौण खनिजाच्या महसुलाचे उद्दिष्ट ९२ कोटी देण्यात आले असून, त्यापैकी दोन महिन्यांत कोटी ३० लाखांची वसुली झाली आहे.'' आर.एच. ब्राह्मणे, गौण खनजि अधिकारी, नगर.
बातम्या आणखी आहेत...