आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोटारसायकली चोरणारी चौघांची टोळी गजाआड; ‘कोतवाली’ची कारवाई, अकरा गाड्या ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- मंडप केटरिंगच्या मजुरीचे काम उरकल्यानंतर घरी जाताना मोटारसायकली चोरणाऱ्या चौघांच्या टाेळीला कोतवाली पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तब्बल ११ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 

बापू नामदेव घुले, अविनाश ऊर्फ अवि श्रीधर घुले, गणेश पोपट पालवे (सर्व रा. बाळेवाडी, ता. नगर) सागर अंबादास सानप या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बुलेट एनफिल्ड कंपनीची मोटारसाकल चोरीला गेल्याची तक्रार कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी संबंधित गाडीचा शोध केला असता पाइपलाइन रस्ता परिसरातील सोमनाथ नंदकुमार बारगळ याच्याकडे ही मोटारसायकल सापडली. 

संबंधित मोटारसायकलीवरील कर्जाचे हप्ते थकल्याने ती फायनान्स कंपनीने ओढून आणली आहे. ती आता फायनान्स कंपनीला िवकायची आहे, असे सांगत बापू घुले याने ती मोटारसायकल बारगळ याला विकली. पोलिसांनी बापू घुले याची अधिक चौकशी केली असता त्याने अन्य आरोपींच्या मदतीने ही मोटारसायकल तेलीखुंट येथून चोरली असल्याचे स्पष्ट झाले. आरोपींच्या चौकशीत चोरीच्या तब्बल ११ मोटारसायकली ताब्यात घेण्यात आल्या. त्यांनी काही मोटारसायकली पाथर्डी बीड जिल्ह्यात विकल्या असल्याची कबुली िदली. शहरात मंडप उभारण्याचे केटरिंगच्या कामसाठी मजुरी करत असल्याचेही आरोपींनी सांगितले. केटरिंगचे काम आटोपले की, घरी जाताना मोटारसायकल चोरत असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त अधीक्षक घनश्याम पाटील, सहायक अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे निरीक्षक अभय परमार यांनी ही कारवाई केली. दीपक गाडीलकर, संजय धामणे, गणेश लबडे, सुमित गवळी, रवींद्र टकले, अविनाश बेर्डे, मुकूंद दुधाळ, रविंद्र घुंगासे, संदीप गवारे, नितिन शिंदे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. त्यांच्याकडून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. 
बातम्या आणखी आहेत...