आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिंगारमधील विविध प्रश्नांबाबत ब्रिगेडिअर नायर यांच्याशी चर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - भिंगारमधीलअनेक प्रश्न प्रलंबित आहेत. विविध नागरी समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. याबाबत कॅन्टोन्मेंटचे अध्यक्ष ब्रिगेडिअर विक्रांत नायर यांच्याशी काँग्रेसचे भिंगार शहराध्यक्ष अॅड. आर. आर. पिल्ले यांनी चर्चा केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनित लोटे, काँग्रेसचे कार्याध्यक्ष श्याम वाघस्कर, कोषाध्यक्ष सुभाष त्रिमुखे, संजय झोडगे आदी उपस्थित होते.
सहा दिवसांपासून भिंगारचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. तो सुरळीत करावा, अशी मागणी पिल्ले यांनी केली. कॅन्टोन्मेंट हद्दीत भुयारी गटार योजनेची कार्यवाही करावी, शौचालयांसाठी अनुदान उपलब्ध करून द्यावे, असे सांगण्यात आले. कापूरवाडी तलाव कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे आहे. त्यातील गाळ काढल्यास पाणीसाठ्यात वाढ होईल. कॅन्टोन्मेंटमधील सर्व सार्वजनिक शौचालये सुलभ शौचालय करण्यात यावीत, असे वाघस्कर म्हणाले. शिवाजी उद्यानाचे नूतनीकरण करून कारंजे बसवावे, अशी मागणी त्रिमुखे यांनी केली. भिंगार शहरात सर्व ठिकाणी एलईडी दिवे बसवावेत, अशी मागणी झोडगे यांनी केले.
भिंगारमधील विविध नागरी समस्यांबाबत कॅन्टोन्मेंटचे अध्यक्ष ब्रिगेडिअर विक्रांत नायर यांच्याशी चर्चा करताना काँग्रेसचे भिंगार शहराध्यक्ष अॅड. आर. आर. पिल्ले. समवेत मुख्य कार्यकारी अधिकारी विनित लोटे, काँग्रेसचे कार्याध्यक्ष श्याम वाघस्कर, कोषाध्यक्ष सुभाष त्रिमुखे, संजय झोडगे आदी.
बातम्या आणखी आहेत...