आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Biometric Foodgrains Distribution Scheme Starts In Nagar

बायोमेट्रिक धान्य वितरण याेजनेचा नगरमधून प्रारंभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते नगरमध्ये बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वाटप सुरू करण्यात अाले.
नगर - स्वस्त धान्य दुकानातील धान्याचा गैरव्यवहार राेखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या बायाेमेट्रीक धान्य याेजनेचा शुभारंभ नगरमधून करण्यात आला. अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांची प्रमुख उपस्थिती हाेती. या प्रणालीत लाभार्थीच्या बोटाचा ठसा घेऊन धान्य देण्यात येते. त्यामुळे कोणत्या दुकानातून लाभार्थीला किती धान्य वितरित झाले, याची माहिती पुरवठा कार्यालयाला ऑनलाइन मिळते. नगर शहरातील ९१ धान्य दुकानांत सुमारे १ लाख ७० हजार बायोमेट्रिक कार्ड आहेत. पहिल्या टप्प्यात १२ दुकानांत या पद्धतीने धान्य वाटप केले जात आहे. ही याेजना यशस्वी करून दुकानदारांचे कमिशन वाढवून देण्याचाही आम्ही विचार करत असल्याचे बापट म्हणाले.