आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा महापुरुषांच्या पुण्यतिथी शासनाने केले रद्द

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महापुरुषांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी त्यांची जयंती, पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी साजरी केली जाते, पण सरकारने भगतसिंह यांच्यासह दहा महापुरुषांचे पुण्यतिथीचे कार्यक्रम यंदा रद्द केले आहेत.

राष्ट्रीय नेत्यांचे स्मृतिदिन साजरे करण्याबाबत दरवर्षी जानेवारीत राज्य सरकारकडून निर्देश दिले जातात. मागील वर्षी सरकारने जाहीर केलेल्या यादीत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, महात्मा बसवेश्वर, महाराणा प्रताप, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण यांच्यासह 29 महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीचे कार्यक्रम साजरे करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, जानेवारी 2013 मध्ये दिलेल्या निर्देशानुसार शासकीय कार्यालयात साजरे करावयाच्या 10 जणांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमांना फाटा दिला गेला. छत्रपती शिवाजी महाराज, शहीद भगतसिंह, पंडित जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक, अहिल्यादेवी होळकर, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.


प्रेरणादायी व्यक्तींचा विसर नको
ज्या महापुरुषांचे आपल्या सर्वांवर उपकार आहेत, त्यांचे प्रेरणादायी विचार जनेतपर्यंत पोहोचण्यासाठी जयंती, पुण्यतिथी या कार्यक्रमांचे आयोजन आवश्यक असते. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे वाईट वाटले. या महापुरुषांच्या कार्याचा विसर पडून नये, यासाठी हे कार्यक्रम करणे आवश्यक आहे.’’ डॉ. गिरीश कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते.

काँग्रेसचा निषेध
शासकीय कार्यालयांमध्ये देशप्रेमी महापुरुषांऐवजी देशद्रोही लोकांच्या जयंती आणि पुण्यतिथी साजरे करायला काँग्रेसचे सरकार थोड्याच दिवसांत सांगेल. महान नेत्यांचे स्मृतिदिन रद्द करणार्‍या काँग्रेसचा आम्ही निषेध करतो.’’ अनिल राठोड, आमदार.