आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढदिवसाचा खर्च टाळून वाचनालयाला पुस्तके

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शाळेतील वाचनालयाला दोनशे पुस्तके व शालेय साहित्य देऊन मुलगी व भाच्याचा वाढदिवस साजरा करत ढवळपुरी येथील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खोडदे यांनी आदर्श घालून दिला.
खोडदे यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून ढवळपुरी येथील आश्रमशाळेत "वाढदिवस माझा, आनंद तुमचा' हा उपक्रम साजरा केला. मुलगी तेजश्री खोडदे व भाचा श्रवण भनगडे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून खोडदे यांनी वाचनालयाला साडेपाच हजारांची दोनशे पुस्तके भेट दिली. गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्या, पेन दिले. मुख्याध्यापक मोहन टकले यांनी या उपक्रमापासून प्रेरणा घेत चार विद्यार्थ्यांना वर्षभर शैक्षणिक साहित्य पुरवण्याचा निर्णय घेतला. सूत्रसंचालन लतिफ राजे यांनी केले, तर राजाराम वाघ यांनी आभार मानले.