आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप कार्यकर्त्यांना शास्त्रशुध्द प्रशिक्षण, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार गोविंदराव केंद्रे यांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - लोकसभा विधनासभा निवडणुकीच्या काळात नव्याने पक्षात आलेल्यांना पक्षाची विचारधारा पक्षाची अन्य माहिती असावी, पक्षाचा कार्यकर्ता कसा असावा,यासाठी कार्यकर्त्यांना शास्त्रशुध्द प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती भाजप प्रदेशचे उपाध्यक्ष माजी आमदार गोविंदराव केंद्रे यांनी शनिवारी दिली.

जिल्ह्यातील महासंपर्क अभियान पंडित दीनदयाळ योजनेंतर्गत निवासी प्रशिक्षण शिबिर प्रभावीपणे राबवण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, युवकचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे, नामदेव राऊत, प्रकाश चित्ते, रवी बोरावके, बापूसाहेब बाचकर, युवराज पोटे, सुवर्णा पाचपुते, नितीन कापसे आदी यावेळी उपस्थित होते. केंद्रे म्हणाले, केंद्र राज्य सरकारच्या विविध योजनांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रभावीत होऊन देशभरातील १५ कोटी सदस्यांची ऑनलाइन नोंदणी झाली आहे. जिल्ह्यातही सुमारे लाख सदस्यांची नोंदणी झाली आहे. या सदस्यांबरोबरच लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या काळात नव्याने पक्षात आलेल्यांना पक्षातील विचारधारा अन्य माहिती मिळावी, यासाठी शास्त्रशुध्द प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पंडित दीनदयाळ प्रशिक्षण वर्गासाठी केंद्राकडून १० हजार ठिकाणी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात केंद्र राज्य सरकारच्या योजना, एकात्मिक मानवता वाद, पक्षाची विचारधारा यासाठी तालुकानिहाय प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्यानंतर १७ मंडलांमध्ये हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. निवडणुकांपुरते लढू नका, सत्ता आणण्यासाठी धडपड करा. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आता देशात वाघ झाला आहे. प्रा. भानुदास बेरड म्हणाले, जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आल्यापासून तालुकानिहाय महासंपर्क अभियानांतर्गत जिल्हाभर दौरे केले. यात प्रशिक्षण अभियानाची प्राथमिक माहिती सर्वांना दिली. प्रशिक्षणामुळे नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांना पक्षाची माहिती देऊन त्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करू, असे ते म्हणाले.

विरोधकांसारखे वागू नका
केंद्रराज्यातील कार्यकर्त्यांना अजूनही आपण सत्तेत असल्याची जाणीव झालेली नाही.कार्यकर्त्यांनी विरोधात असल्यासारखे वागू नये, असे केंद्रे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन योजना, १२ रुपयांत िवमा, बेटी बचाओ अशा अभिनव योजनांमुळे जनतेचे मन जिंकले आहे. त्यामुळेच विश्वविक्रमी सभासद नोंदणी झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...