आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा रुग्णालयात जागरण गोंधळ, भाजपच्या युवा मोर्चातर्फे आंदोलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - विविध मागण्यांसाठी भाजप युवा मोर्चाने जिल्हा शासकीय रुग्णालयात जागरण गोंधळ घालत आंदोलन केले. भाजपच्या शहर जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष नितीन शेलार, उपाध्यक्ष उमेश साठे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. युवा मोर्चाचे सरचिटणीस सागर कराळे, अज्जू शेख, सुजित खरमाळे, नितीन जोशी, तुषार पोटे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. एम. सोनवणे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, जिल्हा शासकीय रुग्णालयांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी कोट्यवधीचा निधी मंजूर करण्यात येतो. मात्र, निधीची विल्हेवाट लावली जाते. अनुदान खर्चासाठी आलेल्या निधीची कार्यालयीन टिप्पणी ठेवता मंजूर केला जातो. कुठलीही निविदा काढता कामे दिली जातात. वैद्यकीय बिले काढण्यासाठी नियमापेक्षा जास्त रक्कम आकारली जाते.
मोफत आैषधोपचारांसह रुग्णांना त्यांच्यासमवेत असलेल्या नातेवाईकांना देण्यात येत असलेल्या आहारात भ्रष्टाचार होतो. जिल्हा रुग्णालयातील कारभाराची समितीमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...