आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bjp And Sena Become Change In Country Said Shivaji Kardile

भाजप, शिवसेना नक्की घडवेल देशात परिवर्तन आमदार शिवाजी कर्डिले यांची ग्वाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- काँग्रेस व राष्ट्रवादीच्या घोषणेला बळी न पडू नका. आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व शिवसेनेकडून देशात परिवर्तन होणार आहे, अशी ग्वाही आमदार शिवाजी कर्डिले यांनी दिली.
संत बाळाजीबाबा मंदिरात स्थानिक विकास निधीतून वडगाव गुप्ता ते लवणवाडी रस्त्यावर भराव टाकणे, खडीकरण, डांबरीकरण आदी कामांचे भूमिपूजन आमदार विजय औटी यांच्या हस्ते झाले. आमदार कर्डिले अध्यक्षस्थानी होते. यावेळी सरपंच सविता गव्हाणे, उपसरपंच भानुदास सातपुते, संदेश कार्ले, शरद दळवी, डॉ. दिलीप पवार, बंडू सप्रे, संजय भोर आदी उपस्थित होते.

कर्डिले म्हणाले, राजकारण पक्षापुरते असते, पण विकासकामे लोकहितासाठी केली जातात. राज्यात व केंद्रात काँग्रेसची सत्ता असल्याने आमदार निधीतून विकासकामे केली जात आहेत. 40 गावांसाठी 90 लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. पैकी वडगावगुप्तासाठी 41 लाखांचा निधी देण्यात आला. निवडणुकांच्या काळात दोन्ही काँग्रेसकडून विविध घोषणा केल्या जातील, पण त्याला बळी पडू नका. आगामी लोकसभेत भाजप व सेनेकडून परिवर्तन होणार आहे. शेतकर्‍यांची गुंठाभरही जमीन रस्त्याच्या व इतर कामासाठी जाऊ देणार नाही, असे कर्डिले यांनी सांगितले. सूत्रसंचालन भाऊसाहेब गव्हाणे यांनी केले, तर आभार प्रभाकर शेवाळे यांनी मानले.

साडेचार लाख लिटर पाणी देणार..
वडगावगुप्ताला दररोज 1 लाख 35 हजार लिटर पाणी मिळते. भाजप व शिवसेनेचे सरकार आल्यानंतर 4 लाख 40 हजार लिटर पाणी देऊ, असे आमदार विजय औटी यांनी सांगितले.