आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Assembly Elections,latest News In Divya Marathi

जिल्हाध्यक्षाविनाच भाजप विधानसभा निवडणुकीत, महिन्यांनंतरही महत्त्वाचे पद रिक्‍त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणूकही जिल्हाध्यक्षाविना लढवण्याची नामुष्की भारतीय जनता पक्षावर आली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार दिलीप गांधी यांच्या उमेदवारीवरून नाराज झालेले अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. ढाकणे यांच्या राजीनाम्याने पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली. ढाकणे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न विनोद तावडे यांनी केला. मात्र, त्यात यश आले नाही.

लोकसभेपासून रिक्त असलेले जिल्हाध्यक्षपद विधानसभा निवडणुकीतही रिक्त आहे. लोकसभा निवडणुकीनंतर जिल्हाध्यक्षाचे नाव जाहीर केले जाईल, असे खासदार दिलीप गांधी यांनी सांगितले होते. त्यानंतर सात महिने उलटूनदेखील पक्षाला अजून जिल्हाध्यक्षपद देता आले नाही. जिल्ह्यात खासदार दिलीप गांधी, आमदार राम शिंदे व शिवाजी कर्डिले असे तीन लोकप्रतिनिधी आहे. असे असताना भाजपला जिल्हाध्यक्षाविनाच निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. गेल्या महिन्यात चंद्रशेखर कदम यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, भाजपतील एका गटाचा कदम यांच्या नावाला तीव्र विरोध झाल्याने त्यांच्या नावाची घोषणा रखडली.