आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनता हीच माझी ताकद : कर्डिले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- मी सर्वसामान्य जनतेचा आमदार आहे. माझ्यामागे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. माझे नातेवाईक राजकारणात नाहीत. गोरगरीब जनता हीच माझी ताकद आहे, असे प्रतिपादन राहुरी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांनी केले.
राहुरी मतदारसंघात समाविष्ट असलेल्या पाथर्डी तालुक्यातील मतदारसंघाच्या प्रचार दौऱ्यात ते बोलत होते. पाथर्डीचे माजी नगराध्यक्ष सुभाष घोडके, डॉ. अजित फुंदे, अनिल पालवे, बबनराव गायकवाड, दिलीप गिते, महादेव गिते, कारभारी गिते, विष्णू गंडाळ, रमाकांत आव्हाड, आसाराम आव्हाड, पद्माकर आव्हाड, बाळासाहेब आव्हाड, शिवाजी पालवे आदी यावेळी उपस्थित होते. कर्डिले म्हणाले, स्व.गोपीनाथ मुंडे यांनी शेवटच्या श्वासापर्यंत तळागाळातील लोकांच्या अडचणी सोडवून सर्वसामान्य माणसांचा नेता म्हणून काम केले. आदर्श महाराष्ट्र घडवण्याचे स्वप्न मुंडे साहेबांनी पाहिले होते ते स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर महाराष्ट्राचे नेतृत्व आमदार पंकजा मुंडे यांच्याकडे द्यावे लागेल. पंकजा मुंडे यांचे हात बळकट करण्यासाठी भाजपला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.