आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Candidate Shivaji Kardile,latest News In Divya Marathi

वावरथ जांभळी परिसरात शिवाजी कर्डिलेंचे स्वागत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- राहुरी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांनी मंगळवारी मुळा धरणाच्या बॅकवॉटर परिसरातील गावांमध्ये प्रचार केला. ग्रामस्थांनी ढोल-ताशांच्या नादात भंडाऱ्याची उधळण करत त्यांचे स्वागत केले.
वावरथ जांभळी पट्ट्यातील अनेक गावांत जाऊन कर्डिले यांनी ग्रामस्थांच्या भेटी घेतल्या. यावेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष नानासाहेब गागरे, विक्रम तांबे, सूर्यभान गाडे, शिवाजी साठे, नानाभाऊ डोंगरे, बाळासाहेब तरवडे, सुभाष गायकवाड, प्रभाकर हरिषचंद्रे, गणेश पारे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
कर्डिले म्हणाले, मागील पाच वर्षांत दुजाभाव न बाळगता मी विकासाला प्राधान्य दिले. मला राजकारणाचा वारसा नाही. मी सामान्य जिरायत शेतकरी कुटुंबातून आलो आहे. माझे इमान सामान्य जनतेशी आहे. काँग्रेस आघाडी सरकारने वर्षानुवर्षे आदिवासी, मागास जमातींची मते घेऊन सत्ता उपभोगली. तथापि, साठ वर्षानंतरही रस्ते, पाणी, शिक्षण यासारख्या मूलभूत सुविधाही आदिवासी, ठाकर, कातकरी, धनगर जमातींना मिळालेल्या नाहीत. केवळ ह्यरह्ण ऐवजी ह्यडह्ण झाल्याने धनगर समाजाला काँग्रेस व राष्ट्रवादीने आरक्षणाच्या हक्कापासून वंचित ठेवले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली विकासाची दिशा घेऊन देशातील वंचित वर्गाची दशा बदलण्याचे काम सुरू झाले आहे. राज्यातही मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार येईल. सरकार स्थापन झाल्यानंतर आदिवासी, ठाकर, कातकरी, धनगरांना जमिनीचे मालकी हक्क देण्याबरोबरच विविध विकासाच्या योजना गतिमान केल्या जातील, असे आश्वासन कर्डिले यांनी दिले.