आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Candidate Shivaji Kardile,latest News In Divya Marathi

तनपुरे-गाडे दुतोंडी, आमदार कर्डिलेंची टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- तनपुरे-गाडे हे विरोधक अपप्रचाराचे विष कालवण्यात पटाईत आहेत. अपप्रचाराखेरीज दुसरे कुठलेही भांडवल त्यांच्याकडे नाही. हे दोघेही दुतोंडी आहेत, अशी टीका राहुरीतील भाजपचे उमेदवार आमदार शिवाजी कर्डिले यांनी केली.
राहुती मतदारसंघात समाविष्ट असलेल्या पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे प्रचार करताना कर्डिले बोलत होते. सुधाकर पालवे, मिर्झा मणियार, बाळ‌ासाहेब अकोलकर, राजेंद्र क्षेत्रे, विक्रम ससाणे, अनिल पालवे, नामदेव मुखेकर, उत्तम अकोलकर, अजहर पठाण, देविदास शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.
कर्डिले म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत विकासाची दिशा घेऊन देशाची दशा बदलण्याचा संकल्प करत निघालेल्या नरेंद्र मोदी यांच्या हाती देशाने सत्ता सोपवली. केंद्राप्रमाणे राज्यात भाजपचे सरकार येणे गरजेचे आहे. त्यामुळे केंद्राकडून विकासाच्या योजनांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होईल. युतीचे सरकार असताना 1995 मध्ये वांबोरी चारीचे काम सुरू झाले. वंचितांना न्याय देण्याची भूमिका गोपीनाथ मुंडे यांची होती. आज निवडणुकीच्या मुहूर्तावर वांबोरी चारी पाटपाण्याच्या गप्पा मारणाऱ्यांचे सरकार 15 वर्षे सत्तेत होते. जिरायताची खरी कळकळ होती, तर 15 वर्षांच्या काळात वांबोरी चारीच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू का झाले? असा सवाल त्यांनी केला.