आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • BJP Claimed On The Shirdi Saibaba Institute Presidency

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अध्यक्ष जिल्ह्याचा की बाहेरचा; भाजपपुढे पेच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदावर भाजपने दावा केला असला, तरी अध्यक्ष हा जिल्ह्याचा करावा की बाहेरचा, असा पेच पक्षासमोर उभा राहिल्याने जून महिन्यात होणारी अध्यक्षपदाची निवड पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.

देशात बालाजी देवस्थानानंतर दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत देवस्थान म्हणून शिर्डीची ओळख आहे. सध्या शिर्डी संस्थानचा कामकाज हे न्यायव्यवस्थेमार्फत चालवले जात आहे. यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या काळात शिर्डी संस्थानचे अध्यक्षपद काँग्रेसकडे, तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे होते. त्यावेळी काँग्रेसचे जयंत ससाणे अध्यक्ष, तर शंकरराव कोल्हे उपाध्यक्ष होते.
राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर या सरकारने काँग्रेस-राष्ट्रवादीचे सूत्र कायम ठेवत मुंबईतील सिध्दिविनायक देवस्थान शिवसेनेकडे, तर शिर्डीचे साईबाबा संस्थान भाजपकडे ठेवण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतला आहे. शिर्डी साईबाबा संस्थानचा अध्यक्ष भाजपचाच असेल, असे पालकमंत्री राम शिंदे यांनी गेल्या महिन्यातच सांगितले होते. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे जिल्हा प्रभारी विठ्ठल चाटे यांनीही अध्यक्षपद भाजपकडेच राहणार आहे.
महिनाभरात अध्यक्षाचे नाव जाहीर केले जाईल, असे सांगितले होते. अध्यक्षपदासाठीच्या निवडीत स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष घालत असल्याने जिल्ह्यातील अनेकांनी मुंबईला जाऊन अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. संस्थानच्या अध्यक्षपदावर भाजपने दावा केला असला, तरी अध्यक्ष जिल्ह्यातील करावा की जिल्ह्याबाहेरचा करावा, असा पेच पक्षासमोर उभा राहिला आहे. त्यामुळे या महिन्यात होणारी अध्यक्षपदाची निवड ही पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.
संस्थानच्या अध्यक्षपदासाठी माजी आमदार चंद्रशेखर कदम, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, सदा देवगावकर, स्नेहलता कोल्हे यांच्या नावाची चर्चा आहे. या पदासाठी दिल्ली मुंबईतील पक्षातील काही वरिष्ठ पदाधिकारी देखील इच्छुक आहेत. अध्यक्षपदासाठी अनेकांची नावे असली, तरी अध्यक्ष कोण याबाबत अजूनही पक्षाच्या स्तरावर निश्चित झालेले नाही. विधानसभा निवडणुकीत पक्षात आलेल्यांना अध्यक्षपद दिले जाणार नसल्याचे सांगण्यात येत असून, जुन्या निष्ठावंतांनच हे पद दिले जाणार आहे.
शिंदे, गांधी यांची भूमिका ठरणार महत्त्वाची
अध्यक्षपदाच्या नियुक्तीमध्ये पालकमंत्री राम शिंदे, आमदार शिवाजी कर्डिले खासदार दिलीप गांधी यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. पालकमंत्री शिंदे यांना अध्यक्षपदासाठी रस नसला, तरी त्यांच्या निकटवर्तीयांच्या नियुक्तीसाठी ते प्रयत्न करतील. आमदार कर्डिले खासदार गांधी देखील निकटवर्तीयांसाठी प्रयत्न करणार आहेत.
जून अखेरपर्यंत अध्यक्ष होणारच
- शिर्डीसाईबाबा संस्थानचा अध्यक्ष हा भाजपचाच असेल. अध्यक्षपदासाठी पक्षाकडून चाचपणी सुरू आहे. लवकरच कोअर कमिटीची बैठक होईल. या बैठकीत अध्यक्षपदाच्या नावाबाबत चर्चा केली जाईल. त्यानंतर जून महिनाअखेरपर्यंत अध्यक्षपदाचे नाव पक्षाकडून जाहीर केले जाईल.''
विठ्ठल चाटे, जिल्हा प्रभारी.