आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपची शहर-जिल्हा कार्यकारिणी जाहीर, जुन्या नव्यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महानगर जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर खासदार दिलीप गांधी यांनी तातडीने महानगर-जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली. यात त्यांनी शहरातील नव्या-जुन्या कार्यकर्त्यांचा समावेश केला आहे. अभय आगरकर यांच्या गटाला मात्र दूरच ठेवले आहे.
कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी सुनील रामदासी, अन्वर खान, संगीता खरमाळे, सुभाष साळवे, दामोदर माखिजा, सरचिटणीसपदी श्रीकांत साठे, किशोर बोरा, चिटणीसपदी जगन्नाथ निंबाळकर, बाळासाहेब गायकवाड, अनंत देसाई, किशोर वाकळे, वसंत राठोड. खजिनदारपदी चेतन जग्गी, प्रसिद्धी प्रमुखपदी गौतम दीक्षित, महिला आघाडी प्रमुखपदी गितांजली काळे, युवा मोर्चा अध्यक्षपदी नितीन शेलार, औद्योगिक आघाडी प्रमुखपदी विश्वनाथ पोंदे, कार्यकारिणी सदस्यपदी धनंजय जामगावकर, संजय ढोणे, शरद ठुबे, हनुमंत भुतकर, तानाजी कांबळे, विठ्ठल कानवडे, जालिंदर तनपुरे, नरेश चव्हाण यांचा समावेश करण्यात आला आहे.

यावेळी बोलताना खासदार गांधी म्हणाले, पक्षाने दिलेली जबाबदारी ही छोटी किंवा मोठी नसते. जी जबाबदारी मिळाली, तिला प्रामाणिकपणे न्याय देऊन काम करणे महत्त्वाचे असते. पक्षाने दिलेल्या संधीचे सोने करुन शहर जिल्ह्यात भाजपला क्रमांक एकचा पक्ष करायचा आहे. केंद्र राज्यात पक्षाची सत्ता असतानाही आपल्याकडे मरगळ आलेली दिसते. आता सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मरगळ झटकून पक्ष कार्याला नव्या जोमात सुरुवात करावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी श्रीकांत साठे, गीता गिल्डा, प्रा. सुनील पंडित, छाया रजपुत, नाना जाधव, नगरसेवक बाबासाहेब वाकळे, श्रीपाद छिंदम, महेश तवले, मालन ढोणे, सुवेंद्र गांधी, सुरेखा विद्ये, विठ्ठल कानवडे, जालिंदर तनपुरे, लीला आगरवाल, गोपाल वर्मा, वसंत राठोड आदी उपस्थित होते. येत्या बुधवारी (६ एप्रिल) पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाचे नियोजन या बैठकीत करण्यात आले.