आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेखी आश्वासनानंतर भाजपचे आंदोलन मागे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- कर्जत तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींत गैरव्यहार झाल्याप्रकरणाच्या चौकशीचा अहवाल देऊन संबंधितावर कारवाई करावी, या मागणीसाठी भाजपतर्फे शुक्रवारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर सोमवारी उपोषण करण्यात आले. अधिकार्‍यांनी मागण्यांसंदर्भात लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन सायंकाळी स्थगित करण्यात आले.

कर्जत तालुक्यातील कोरेगाव, म्हाळंगी व थेरवडी या ग्रामपंचायतीत मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. याप्रकरणी संबंधितावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भाजपने खेडकर यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करण्यात आले. या उपोषण आंदोलनात कर्जतचे उपसरपंच नामदेव राऊत, जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, शशिकांत पाटील, प्रकाश शेळके आदींनी सहभाग घेतला. खेडकर म्हणाले, तीनही ग्रामपंचायतींच्या कारभारासंदर्भात भाजपने कर्जत पंचायत समितीसमोर यापूर्वीच आंदोलन केले होते. त्यावेळी प्रशासनाकडून कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, या ग्रामपंचायतींवर अद्याप कारवाई झाली नाही.

कोरेगाव ग्रामपंचायत ही जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र फाळके यांच्या गावातील आहे. त्यामुळे ग्रामपंचायत याप्रकरणी तपासणी करण्यास टाळाटाळ करीत आहे. तसेच म्हाळंगी ग्रामपंचायतीतही गैरव्यवहार झाला आहे. जिल्हा परिषद सदस्यांकडून गटविकास अधिकार्‍यांवर दबाव आणला जात असून कामात अडथळा निर्माण केला जात आहे. याप्रकरणी तीनही ग्रामपंचायतींची दप्तर तपासणी का करण्यात आली नाही?, याचा खुलासा करून संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीसाठी आंदोलन केले.

यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने सकारात्मक भूमिका घेत लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले असल्याचे खेडकर यांनी सांगितले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.