आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या बैठकीला महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - सरकार स्थापन झाल्यानंतर तब्बल पाच महिन्यांनी जिल्हा भाजपच्या बैठकीला मुहूर्त मिळाला. शुक्रवारी (१ मे) ही बैठक होत आहे. प्रथमच निवडून आलेले नवीन तीन आमदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. रखडलेल्या जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीबाबत मात्र यावेळी चर्चा होण्याची शक्यता कमीच आहे.

डिसेंबरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. पहिल्या मंत्रिमंडळात नगर जिल्ह्याला संधी मिळाली नाही. नंतरच्या िवस्तारात कर्जत-जामखेडचे आमदार राम िशंदे यांना मंत्रिपद देण्यात आले. सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपमध्ये काही काळ फील गुड वातावरण होते. त्यानंतर मात्र मरगळ आली. आता पाच महिन्यांनंतर पालकमंत्री राम िशंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा भाजपच्या बैठकीसाठी मुहूर्त सापडला आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजता टिळक रस्त्यावरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात ही बैठक होत आहे. या बैठकीसाठी भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे, स्नेहलता कोल्हे व मोनिका राजळे प्रथमच उपस्थित राहणार आहेत.

पाच लाख सदस्य
बैठकीत भाजपचे संघटक विठ्ठल चाटे सदस्य नोंदणीचा आढावा घेणार आहेत. त्याचबरोबर नव्याने सुरु होणाऱ्या महासंपर्क अभियानाबाबत ते चर्चा करतील. नगर िजल्ह्यात सदस्य नोंदणीला चांगला प्रतिसाद िमळत असून, आतापर्यंत पाच लाख सदस्य नोंदणी झाली आहे.''
प्रा. भानुदास बेरड,जिल्हा सरचिटणीस.