आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपची उद्या मुंबईत बैठक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - लोकसभा निवडणुकीतील विजयी घोडदौड विधानसभा निवडणुकीत कायम ठेवण्याबाबत चर्चा करण्यासाठी प्रदेश भाजपची गुरुवारी (3 जुलै) मुंबईत बैठक होत आहे. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या या बैठकीला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व पदाधिका-यांना बोलावण्यात आल्याची माहिती जिल्हा सरचिटणीस प्रा. भानुदास बेरड यांनी दिली. लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपने 24 जागा लढवल्या. त्यातील 23 जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झाले.
फोटो - डमी पिक
देशात एकहाती सत्ता आणण्यात पक्ष यशस्वी ठरला. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीतील रणनिती ठरवण्यासाठी अंधेरी स्पोर्टस् कॉम्प्लेक्सजवळच्या शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलात बैठक होत आहे. राजकीय व कृषिविषयक प्रस्ताव व अन्य विषयांवर यावेळी चर्चा होईल. खासदार, आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे सदस्य, सर्व प्रदेश आघाड्या, मोर्चा, सेलचे अध्यक्ष, सरचिटणीस या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.